Basil Leaves For Skin: भारतात तुळशीला खूप महत्त्व आहे. अनेक लोक तुळशीची पूजा करतात. तुळस ही एक औषधी वनस्पती आहे, असं म्हटलं जात. तुळस त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे. तुळशीच्या पानांचे सेवन देखील तुम्ही करु शकता. तुळशीच्या पानांचा फेसपॅक लावल्यानं त्वचेच्या संबंधित समस्या दूर होतील. तुळशीच्या पानांचा फेसपॅक कसा तयार करायचा? असा प्रश्न तुम्हाला पडला असेल. जाणून घेऊयात तुळशीच्या पानांचा फेसपॅक तयार करण्याची सोपी पद्धत...


असा तयार करा फेसपॅक


तुळशीच्या पानांचा फेसपॅक बनवण्यासाठी 25 ते 30 तुळशीची पाने आणि तेवढीच कडुलिंबाची पाने घ्या. त्यांना चांगले बारीक करून पेस्ट बनवा आणि नंतर एक चमचा मध घाला. हे सर्व निट मिक्स करुन घ्या. हा तुळशीच्या पानांचा फेसपॅक तुम्हाला चेहऱ्यावर 10 मिनिटे लावावा लागेल. त्यानंतर हा फेसपॅक कोमट पाण्यानं धुवा. तसेच तुळशीची पाने आणि दह्याचा देखील तुम्ही फेसपॅक तयार करु शकता. त्यासाठी तुळशीच्या पानांची पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक ते दोन चमचा दही घाला. 


तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या फेसपॅकचे फायदे



त्वचा स्वच्छ होते


तुळशीच्या पानांपासून तयार केला फेसपॅक हा नॅचरल क्लींजर आहे. या फेसपॅकमुळे चेहऱ्यावरील त्वचेवरील धूळ निघून जाते आणि त्वचा स्वच्छ होते.


पिंपल्स निघून जातील


तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या फेसपॅकमुळे पिंपल्स निघून जातील. कारण त्यामध्ये अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे चेहऱ्यावरील अतिरिक्त तेल काढून टाकते. पिंपल्समुळे होणारी जळजळ देखील तुळशीच्या पानांच्या फेसपॅकमुळे कमी करते.


त्वचेवर येईल ग्लो


तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या फेसपॅकमुळे चेहऱ्यावर लावल्यामुळे त्वचेवर ग्लो येतो. कारण हा फेसपॅक लावल्यानंतर त्वचेचं प्रदूषण आणि UV किरणांपासून संरक्षण होतं. तुळशीच्या पानांपासून तयार केलेल्या फेसपॅक लावल्यानं चेहऱ्यावर कोणतेही इन्फेक्शन्स देखील होत नाही. 


तुळशीच्या बियांमध्ये अँटी- ऑक्सीडेंट्सचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे रोज सकाळी तुळशीच्या बिया खाव्यात. तुळशीच्या बियांमध्ये फ्लॅवोनोइड्स आणि फेनोलिक असते.ज्यामुळे शरीराची रोग प्रतिकात्मक शक्ती वाढते. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


वाचा इतर महत्वाच्या बातम्या:


Basil Seeds Benefit : तुळशीच्या पानांपेक्षा बियाही गुणकारी; प्रोटीन, फायबर, आर्यनचा भरपूर खजाना