Health Tips :  जगभरात करोडो चहा प्रेमी आहेत. चहा (Tea) हे असे पेय आहे, ज्याशिवाय अनेक लोकांच्या दिवसाची सुरुवात होत नाही. ब्लॅक टी, ग्रीन टी, हर्बल टी असे चहाचे अनेक प्रकार आहेत. पण भारतातील सर्वात आवडता चहा म्हणजे दुधाचा चहा. या चहामध्ये पाणी, आले, वेलची आणि दालचिनी वापरली जाते. अनेक जण दिवसातून दोन-तीन कप चहा पितात. चहासोबत अनेकांना बिस्किट, खारी, टोस्ट इत्यादी खायला आवडते. पण चहासोबत काही पदार्थांचे सेवन करणे टाळावे. चहासोबत या पदार्थांचे सेवन करणं टाळा-

केक, चॉकलेट, बिस्किटे यांसारख्या गोड पदार्थही चहासोबत टाळावेत. हे पदार्थ चहासोबत खायला अनेकांना आवडतात, पण यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढते. कारण या खाद्यपदार्थांमध्ये साखरेचे प्रमाण जास्त असते. साखर केवळ मधुमेही रुग्णांसाठीच घातक नसून, इतर  व्यक्तीसाठीही साखरेचे अतिसेवन घातक आहे. चहासोबत गोड पदार्थ खाल्ल्यानं एनर्जी लेवल कमी होते. त्यामुळे अनेक आरोग्य समस्या उद्भवू शकतात.

तळलेले पदार्थ- तळलेले पदार्थ  पचायला जड असतात. हे खाल्ल्याने तुम्हाला सुस्तपणा जाणवू शकतो. चहाचे सेवन केल्यानं पचन क्रिया चांगल्या पद्धतीनं होते, परंतु त्याच्यासोबत तळलेले पदार्थांचे सेवन करणे धोकादायक ठरू शकते. त्यामुळे कांदा भजी, पुऱ्या यांसारख्ये तळलेल्या पदार्थांचे सेवन चहासोबत करणे टाळा. 

चहासोबत मसालेदार आणि तळलेले पदार्थ खाणं टाळावं. लसूण, कांदा, कढीपत्ता आणि मिरची यांचा वापर करुन तयार करण्यात आलेले पदार्थ चहासोबत खाणे टाळा. 

आम्लयुक्त खाद्यपदार्थ म्हणजेच अॅसिडिट फूड  चहासोबत खाऊ नयेत. कारण ते खाल्ल्याने शरीराला चहामध्ये आढळणारे कॅटेचिन (अँटीऑक्सिडंट्स) शोषून घेणे कठीण होते. 

डेअरी प्रोडक्ट्स- चहासोबत दूध, पनीर किंवा मलई इत्यादी दुग्धजन्य पदार्थांचे सेवन केल्याने चहामध्ये आढळणारे पॉलीफेनॉलचा परिणाम शरीरावर होत नाही.  

चहा पिताना हिरव्या पालेभाज्या, मसूर, धान्ये यांसारखे लोहयुक्त पदार्थ खाणे टाळावे. तज्ज्ञांच्या मते, चहामध्ये टॅनिन आणि ऑक्सलेट्स भरपूर प्रमाणात असतात, जे शरीराला या पदार्थांमधून लोह शोषण्यापासून रोखतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्वाच्या इतर बातम्या :

Tea : चहाचे शौकीन आहात? दिवसातून किती कप चहा पिणे योग्य? काय सांगतो रिपोर्ट