Diabetes: अलीकडील काळात मधुमेहाचे प्रमाण प्रचंड वाढले आहे. त्याचप्रमाणे या आजारामुळे अंधत्वाचे प्रमाणदेखील वाढले आहे. आकडेवारीनुसार, जगभरात 422 दशलक्ष व्यक्ती मधुमेही आहेत. तसेच जगभरात दरवर्षी 1.5 मिलिअन मृत्यू होत असतात. जगभरातील 2.6 अंधत्वासाठी हा आजार कारणीभूत आहे. रक्तशर्करेचे प्रमाण सामान्य पातळीपेक्षा जास्त असणे हे अंधत्वाचे थेट कारण नाही. परंतु मधुमेहामुळे डायबेटिक रेटिनोपथीसारखे डोळ्याचे आजार होण्याची शक्यता वाढते. यामुळे कालांतराने दृष्टी पूर्णपणे गमावली जाते. 


मधुमेहच्या आजाराविषयी डॉक्टर नटराजन म्हणतात,"दर 4 पैकी 1 व्यक्तीला (विशीपासून ते साठीपर्यंत) निदान न झालेला मधुमेह असतो. अनेकदा डोळ्यांच्या समस्येमुळे हा आजार असल्याची जाणीव होते. डायबेटिक आय डिसीजच्या (मधुमेह नेत्र आजार) लक्षणांची माहिती असणे महत्त्वाचे असते. त्यावर वेळीच उपचार केले नाही तर पूर्ण अंधत्व येऊ शकते".


डायबेटिक रेटिनोपथीमध्ये असलेल्या जोखीम घटकांत मधुमेह अधिक कालावधीपर्यंत असणे, रक्तशर्करेवर कमी नियंत्रण, उच्च रक्तदाब, कोलेस्टरॉलची उच्च पातळी, गरोदरपणा यांचा समावेश असतो. सुरुवातीच्या टप्प्यावर कोणतीही लक्षणे दिसत नाहीत. जसजसा हा आजार बळावत जातो, तसतसे धुरकट दिसू लागते, डोळ्यातील जेलीसारखा पदार्थ अधिक पातळ होऊ लागतो किंवा दृष्टीमध्ये काळे डाग किंवा रिकामे भाग निर्माण होणे अशी परिस्थिती निर्माण होते, जेव्हा हा आजार सौम्य ते मध्यम स्वरुपाचा असतो आणि अचानक दृष्टी निकामी झाली तर त्याला नॉन-प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपथी (एनपीडीआर) आणि याच्याच पुढील टप्प्याला प्रोलिफरेटिव्ह डायबेटिक रेटिनोपथी (पीडीआर) म्हणतात.


ड्रॉप्स वापरून डोळ्याची बाहुली विस्फारून आणि रेटिनाची चाचणी करून डायबेटिक रेटिनोपथीची वैद्यकीय चाचणी केली जाते. जर बदल आढळून आला तर एफएफए आणि ओसीटी चाचण्या केल्या जातात आणि या आजाराचे गांभीर्य व तीव्रता समजून घेतली जाते. इजा झालेल्या रक्तवाहिन्यांवर लेझरने उपचार करण्यात येतात.  


संबंधित बातम्या


जिऱ्याचं पाणी प्यायल्याने झटपट कमी होईल वजन; जाणून घ्या तयार करायची सोपी पद्धत


मेंदूतील रक्तप्रवाहावर मिठाचा परिणाम; रिपोर्टमधून धक्कादायक माहिती समोर 


Health Care Tips : फिट राण्यासाठी घरी करा हा व्यायाम; जिममध्ये जाण्याची गरज नाही


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha