Heart Failure reasons AI tools: नुकत्याच केलेल्या एका अभ्यासातून हृदयविकाराच्या झटक्याच्या (Heart Failure) कारणांचे संशोधन करण्यात आले आहे. ही कारणं रुग्णांना भविष्यात होणाऱ्या त्रासापासून वाचवण्यास मदत करतील असं देखील सांगितलं जात आहे. जेव्हा आपल्या हृदयाला शरीरात रक्तपुरवठा करण्यास त्रास होतो तेव्हा हार्ट  फेल्युअर झाल्याचं म्हटलं जातं. परंतु सध्या ज्यामुळे हार्ट फेल्युअर झाल्याचं समजतं ती कारणं या आजाराचं योग्य विश्लेषण करण्यास कदाचित कमी पडू शकतात असं देखील या अभ्यासातून समोर आलं आहे. परंतु हा अभ्यास कोणत्या पुस्तकातून नाही तर AI टूलचा वापर करुन करण्यात आला आहे.  AI टूलच्या माध्यमातून एक अॅप विकसित करण्यात आले त्यामधून या आजाराचे निरीक्षण करण्यात आले आहे. हे संशोधन करणाऱ्या टीमने एक अॅप  विकसित केले ज्याचा वापर हार्ट फेल्युअर असलेल्या व्यक्तीला कोणता उपप्रकार आहे हे ओळखण्यासाठी डॉक्टर करु शकतात. 


या अभ्यासाठी जवळपास तीन लाख लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले. यामध्ये ज्यांचे वय 30 वर्षांपेक्षा अधिक आहे आणि ज्यांचा हा आजार 20 वर्षांहून जूना आहे अशा व्यक्तींचा समावेश करण्यात आला होता. अनेक संशोधनाच्या पद्धतींचा अवलंब केल्यानंतर असे निदर्शनास आले की, हा आजार पाच टप्प्यांमध्ये होतो. सुरुवातीला हा आजार प्राथमिक टप्प्यात असतो, नंतर तो पुढच्या टप्प्यात जातो. नंतर ऍट्रियल फायब्रिलेशनचा त्रास होऊ लागतो. यामध्ये तुम्हाला हृदयाचे ठोके व्यवस्थित होत नसल्याचं जाणवतं. त्यानंतर रक्तवाहिन्यांसंबंधी त्रास जाणवण्यास सुरुवात होते. कार्डिओमेटाबॉलिकचा त्रास होण्यास सुरुवात होते. यामध्ये तुम्हाला रक्तप्रवाहशी संबंधित समस्या निर्माण होतात. 


अनेक मशीन लर्निंग पद्धतींचा वापर


अनेक मशीन लर्निंग पद्धतींचा वापर करून, या संशोधनात या आजाराच्या पाच उपप्रकारांची ओळख निर्माण करण्यात आली. परंतु या संशोधनामध्ये वर्षभरात रुग्णांच्या मृत्यूच्या कारणांमध्ये आणि या प्रकारांमध्ये बराच फरक आढळून आला. तसेच या आजाराचे निदान या उपप्रकारात होण्याची टक्केवारी देखील सांगण्यात आली आहे. प्राथमिक टप्प्यात (20 टक्के), नंतरच्या टप्प्यामध्ये (46 टक्के),  ऍट्रियल फायब्रिलेशन  (61 टक्के), रक्तवाहिन्यांसंबंधी त्रास (11 टक्के) कार्डिओमेटाबॉलिक (37 टक्के) अशी टक्केवारी या संशोधनातून समोर आली आहे. तसेच आता हे अॅप खरचं फायदेशी आहे का याचं सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचं देखील सांगितलं जात आहे. तसेच हे अॅप डॉक्टरांना रुग्णांच्या रुटीन तपासणीसाठी देखील मदत करेल अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :