Majha Katta Sulochana Gawande : कॅन्सरची लागण होऊ नये म्हणून नागरिकांनी योग्य ती काळजी घेणं गरजेचं असतं. यामध्ये सर्वांनी पहिलं म्हणजे तंबाकूच्या सर्व प्रकारापासून दूर राहिलं पाहिजे. तसेच दारुपासून दूर राहणं गरजेचं असल्याचे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे  (DR. Sulochana Gawande) यांनी व्यक्त केलं. डॉ. सुलोचना गवांदे या एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कॅन्सर आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. आपला आहार संतुलीत असला पाहिजे. तसेच व्यायाम हा प्रकार आपल्याकडे खूप कमी आहे. आपण त्याकडे लक्ष दिले पाहिजे असे सुलोचना गवांदे म्हणाल्या.


कॅन्सर होऊ नये म्हणून खबरदारी घ्यावी


पूर्वी आपला आहार खूप चांगला होता. हजारो वर्षाच्या पंरपरेला धरुन आहार होता. पण अलिकडे आपण तो आहार सोडून दिल्याची माहिती सुलोचना गवांदे यांनी दिली. त्यामुळं सर्व गोष्टींवर लक्ष देणं गरजेचं आहे, विशेष म्हणजे तुम्ही चांगल्या सवयी नाही लावल्या तर तुमच्या पुढच्या पिढीला तुम्हा काय देणार? असा सवाल सुलोचला गवांदे यांनी केला. तुम्ही जर सतत किटकनाशके वापरलेल्या भाज्या खात असाल तर कॅन्सरचा धोका वाढू शकतो असे सुलोचना गवांदे म्हणाल्या. फळे शक्यतो गरम पाण्याने स्वच्छ करावीत किंवा जिथं शक्य आहे तिथं साल काढून खावी असे गवांदे म्हणाले. 


फोनमुळं कॅन्सर होतो यावर अद्याप कोणतही संशोधन नाही


मोबाईल टॉवरच्या जवळ राहिल्याने कॅन्सर होत नाही. कारण मोबाईल टॉवरमधून जे प्रक्षेपीत होते ते क्षकिरण डायरेक्ट आपल्या शरीरात जात नाहीत. फोनमुळं कॅन्सर होतो यावर अद्याप कोणतही संशोधन आपल्याकडे झालेलं नाही. हे सिद्ध देखील झालेलं नसल्याचे मत डॉ. सुलोचना गवांदे यांनी व्यक्त केलं. जे लोक फोन खूप वापरतात त्यांनी एयर फोन वापरावेत असा सल्ला गवांदे यांनी दिला. प्लॅस्टिकच्या भांड्यात माल स्टोर करावा. 


कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं नाही, आता प्रभावी उपाय


कॅन्सर झालेल्या व्यक्तीने घाबरुन जाण्याची गरज नाही. तो व्यक्ती व्यवस्थीत त्याचे आयुष्य जगू शकतो. अलिकडच्या काळात कॅन्सरवर अतिशय प्रवाभी उपाय आले असल्याचे सुलोचना गवांदे म्हणाल्या. त्यामुळं कॅन्सर झाला म्हणजे आयुष्य संपलं असं कोणाही समजू नये असे गवांदे म्हणाल्या. कॅन्सरवरील उपचार पद्धती समजून घेणं गरजेचं आहे. कॅन्सर झाल्यावर वेळोवेळी ताप येणं, थकवा येण अशी लक्षणं दिसतात. हे बदल अनपेक्षीत होतात. वजन कमी होणं, जेवण न जाणं. वारंवार एखादी गोष्ट घडत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.  


महत्त्वाच्या बातम्या:


Majha Katta : भारतात कॅन्सरचं प्रमाण वाढतंय, नेमकी काय आहेत कारणं? डॉ. सुलोचना गवांदे म्हणाल्या....