Majha Katta Sulochana Gawande : अलिकडच्या काळात कॅन्सरबाबत लोक जागरुक होत आहेत. त्यामुळं कॅन्सरचे प्रमाण कमी होत आहे. पण बाहेरच्या देशात कॅन्सरचे प्रमाण कमी होत आहे. पण आपल्या देशात ते प्रमाण कमी होत नसल्याचे मत प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे  (DR. Sulochana Gawande) यांनी व्यक्त केलं. डॉ. सुलोचना गवांदे या एबीपी माझाच्या माझा कट्ट्यावर आल्या होत्या. यावेळी त्यांनी कॅन्सर आजाराबद्दल सविस्तर माहिती दिली. भारतात कॅन्सरचे प्रमाण कमी न होण्याची अनेक कारणं आहेत. यामध्ये एक म्हणजे प्रदुषण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे सिगारेट ओढण्याचे वाढलेलं प्रमाण. अमेरिकेच सिगारेट ओढण्याचे प्रमाण खूप कमी झालं आहे. आपल्याकडे खाण्याच्या पद्धती बदलल्या आहेत. व्यायामाची सवय नाही. 


पूर्वी लोक पालेभाज्या मोठ्या प्रमाणात खात होते. त्यामुळं आतड्याचा कॅन्सरचे प्रमाण खूप कमी होते पण अलिकडे आतड्याच्या कॅन्सरचे प्रमाण वाढल्याचे सुलोचना गवांदे म्हणाल्या. परदेशातील लोक जागरुक होत आहेत. कॅन्सरा पोषक ठरणाऱ्या गोष्टी त्या टाळक असल्याचे गवांदे म्हणाल्या.


किमोथेरपी म्हणजे काय? 


किमोथेरपी (Chemotherapy) या उपचार पद्धतीबद्दल आपल्याकडे खूप गैरसमज आहेत. किमोथेरपी ही एक उपचार पद्धती आहे, जी कर्करोगाच्या रुग्णांवर कर्करोगाच्या पेशी मारण्यासाठी केली जाते. किमोथेरपीमध्ये, डॉक्टर हे विविध प्रकारचे ड्रग्ज किंवा केमिकल्सचा वापर आजार बरा करण्यासाठी करतात. कॅन्सरच्या पेशी शरीरात वेगाने वाढतात, त्या पेशी वेगाने वाढू नये म्हणून किमोथेरपी उपचार पद्धती केली जात असल्याचे 


मेंदूच्या आणि डोळ्यांचे कॅन्सरवर उपाय नाही


कॅन्सरवर पूर्ण बरे होण्याचे औषध कधीच मिळणार नाही. कारण अनेक प्रकारचे कॅन्सर आहेत. लहान मुलांना देखील कॅन्सर होत आहे. पण हे प्रमाण फार कमी आहे. काहीवेळेला जनुकांमधील बदलामुळं कॅन्सर होत असल्याचा मत प्रवाह आहे. मुलांना जास्त प्रमाणात रक्ताचा कॅन्सर होतो, पण त्याच्यावर आता चांगले उपाय निघाले असल्याचे गवांदे म्हणाल्या. पण मेंदूचे आणि डोळ्यांचे जे कॅन्सर होतात, त्यावर दुर्दैवाने अजूनही उपाय नसल्याचे मत गवांदे यांनी व्यक्त केलं. फक्त स्ट्रेसमुळं कॅन्सर होत नाही. त्याबद्दलची काही माहिती संशोधनातून समोर आली नसल्याचे मत डॉ. प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे  (DR. Sulochana Gawande) यांनी व्यक्त केलं.  कॅन्सरचे प्रमाण वाढले असे मला वाटत नाही. पण कॅन्सर जास्त प्रमाणात शोधला जात असल्याचे सुलोचना गवांदे म्हणाल्या. 


महत्त्वाच्या बातम्या:


Majha Katta : कॅन्सर नेमका का होतो? कॅन्सरवर उपाय काय? प्रसिद्ध कर्करोगतज्ज्ञ डॉ. सुलोचना गवांदे माझा कट्ट्यावर