Weight Loss : आजच्या काळात बदलती जीवनशैली, वारंवार जंक फूड, व्यायाम न करणे, सतत मोबाईल, अपूर्ण झोप, या सर्व गोष्टींमुळे लोकांच्या शरीरात स्थूलपणा तसेच चरबीचे प्रमाण वाढत चाललंय. लठ्ठपणा ही भारतीयांमध्ये झपाट्याने वाढणारी समस्या बनत आहे. लठ्ठपणामुळे तुमच्या शरीराचे व्यक्तिमत्व तर बिघडतेच शिवाय अनेक आजारही होतात. लठ्ठपणामुळे एखादी व्यक्ती फॅटी लिव्हर, मधुमेह, कोलेस्ट्रॉल, हृदयविकार, उच्च रक्तदाब, पक्षाघात आणि कर्करोग यांसारख्या घातक आजारांनाही बळी पडू शकते. जर तुम्ही तुमची जीवनशैली आणि खाण्याच्या सवयी चांगल्या ठेवल्या तर तुम्ही या आजारांपासून दूर राहू शकता. लठ्ठपणाचा सामना करण्यासाठी, आपण निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे आणि पोषक तत्वांनी समृद्ध आहार समाविष्ट करणे महत्वाचे आहे. आजच्या लेखात आम्ही तुम्हाला असे काही पदार्थ सांगत आहोत जे तुमचे वजन नियंत्रित ठेवण्यास मदत करतील.


मोड आलेले कडधान्य (स्प्राऊट्स)


एका महिन्यातच तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल, लठ्ठपणा कमी करायचा असेल, तर तुमच्या आहारात स्प्राउट्सचा म्हणजेच मोड आलेल्या कडधान्यांचा नक्कीच समावेश करा. तुमच्या नाश्तामध्ये तुम्ही मूग, हरभरा, सोयाबीन, शेंगदाणे भिजवून मोड आणू शकता. लठ्ठपणा कमी करण्यासाठी आरोग्य तज्ज्ञ देखील प्रथिने युक्त स्प्राउट्स खाण्याचा सल्ला देतात. नाश्त्यात स्प्राउट्स खाल्ले तर अगदी उत्तम.


मेथी दाणे


आयुर्वेदानुसार मेथी दाणे शरीरासाठी अमृतापेक्षा कमी नाही. वजन कमी करण्यातही मेथी गुणकारी मानली जाते. ही पचनसंस्था सुधारते, जे वजन कमी करण्यासाठी महत्वाचे आहे. मेथीमध्ये आढळणारे घटक भूक कमी करण्यास आणि दीर्घकाळ पोट भरल्याचा अनुभव घेण्यास मदत करतात. याशिवाय शरीरातील चयापचय क्रियाही वाढवते. तुम्ही मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवू शकता, सकाळी ते पाणी पिऊ शकता आणि भिजवलेल्या बिया चावून खाऊ शकता.


अंडी


आपण ही म्हण नेहमीच ऐकत आलो, की संडे असो की मंडे, रोज खा अंडी, खरं तर अंडी आरोग्यासाठी चांगली असतात. त्याच वेळी, जेव्हा वजन कमी करण्याचा प्रश्न येतो तेव्हा ते तुमच्यासाठी खूप आरोग्यदायी असतात. अंडी हा प्रोटीनयुक्त आहार आहे. ज्यामुळे तुमचे पोट जास्त काळ भरलेले राहते. त्यामुळे तुमच्या नाश्त्यात अंड्याचा समावेश करा. अंडी खाल्ल्याने शरीर निरोगी राहते आणि तुमची जास्त खाण्याची इच्छा कमी होते. दोन अंडी खाल्ल्याने शरीराला आवश्यक पोषण सहज मिळते.


फळ


फळे आरोग्यासाठी किती महत्त्वाची आहेत हे आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु जर तुम्ही फळांना तुमच्या नाश्त्यामध्ये समाविष्ट केले तर तुम्हाला त्याचे अधिक फायदे होतील. निरोगी नाश्त्यासाठी, तुमच्या नाश्त्यामध्ये फळांचा समावेश करा. कारण त्यात भरपूर फायबर असते ज्यामुळे पोट सहज भरते. इतकंच नाही तर फळं शरीराला डिटॉक्स करतात आणि भरपूर जीवनसत्त्वं देतात.


 


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Health News : निरोगी राहायचा मंत्र तुमच्याच किचनमध्ये! आरोग्यासाठी 'हे' मसाले खूप उपयुक्त, जेवणही बनते चविष्ट