Health Tips : जवळपास प्रत्येकाच्या घरी सकाळी नाश्त्याला अंडी (Eggs) ही असतातच. अंड्यांपासून बनवलेलं ऑमलेट, बुर्जी, सॅंडविच अनेकजण अगदी आवडीने खातात. याचं कारण म्हणजे अंड्यांमध्ये प्रोटीनचं प्रमाण खूप जास्त असते. अंडी हा प्रथिनांचा उत्तम स्रोत मानला जातो. अंडी केवळ नाश्त्यातच नव्हे तर दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणातही कधीही खाऊ शकतात. अंड्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य म्हणजे त्यापासून बनवलेली रेसिपी अतिशय सोपी आणि झटपट तयार करता येते. त्याच वेळी, काही संशोधनातून हे देखील सिद्ध झालं आहे की असे काही आजार आहेत ज्यांच्या रुग्णांनी चुकूनही अंड्यांचं सेवन करू नये. हे आजार नेमके कोणते आहेत त्यांच्याविषयी सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
'हे' आजार असणाऱ्यांनी अंडी खाऊ नयेत
हृदयरोग
हृदयविकाराचा त्रास असलेल्या रुग्णांनी चुकूनही अंडी खाऊ नयेत. अंडी खाल्ल्याने आजार वाढू शकतो. त्यामुळे रक्ताभिसरणात समस्या निर्माण होऊ शकतात. हे अत्यंत धोकादायक असू शकते.
पोटाचा त्रास असलेल्या रूग्णांनी अंडी खाऊ नयेत
अंड्याचा स्वभाव उष्ण असतो. जर एखाद्या व्यक्तीचे पोट खराब असेल तर त्याने अंडी खाऊ नये, यामुळे समस्या वाढू शकते.
बद्धकोष्ठतेमध्ये अंडी खाऊ नयेत
बद्धकोष्ठतेच्या बाबतीत अंडी खाऊ नयेत कारण यामुळे पचनाच्या समस्या आणि अस्वस्थता वाढू शकते.
कोलेस्ट्रॉल
ज्यांना कोलेस्ट्रॉलचा त्रास आहे त्यांनी अंडी अजिबात खाऊ नयेत. का खाल्ल्याने ते आणखी वाढू शकते.
मधुमेह
मधुमेहाच्या रुग्णांनी अंडी खाणे टाळावे. जर तुम्हाला अंडी खायला आवडत असतील तर एकदा डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.
कॅन्सरसारख्या आजारांपासून दूर राहायचं असेल तर दररोज अंडी खावीत. हार्वर्ड यूनिव्हर्सिटीच्या 2003 च्या संशोधनानुसार, अंडी खाल्ल्याने प्रौढ महिलांमध्ये स्तनाच्या कर्करोगाचा धोका कमी होतो. 2005 च्या आणखी एका अभ्यासानुसार, ज्या महिलांनी आठवड्यातून 6 अंडी खाल्ल्या त्यांना स्तनाच्या कर्करोगाचा धोका 44 टक्क्यांनी कमी झाला. तुम्ही अंडी कोणत्याही स्वरूपात खाऊ शकता. फक्त उकडलेले अंडे खाणे आवश्यक नाही. निरोगी राहायचं असेल तर अंड्याचं सेवन करू शकता. अंड्यातील सर्वात पौष्टिक पदार्थ म्हणजे अंड्यातील पिवळं बलक ज्यामध्ये 90 टक्के कॅल्शियम आणि लोह असते. याचं सेवन अवश्य करावं.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Skin Care Tips : तुमच्या 'या' चुकांमुळे चेहरा काळवंडतो; चमकदार आणि नितळ त्वचेसाठी फॉलो करा 'हे' उपाय