Health Tips : आपले केस हे आपल्या त्वचेप्रमाणेच खूप काही सहन करतात. सूर्यप्रकाश, धूळ आणि घामामुळे केसांना खूप नुकसान होते, ज्यामुळे केस गळतात किंवा इन्फेक्शन होतात. केस सुंदर ठेवण्यासाठी वेळोवेळी केस धुणे आणि त्यांची काळजी घेणे खूप गरजेचे आहे. पण केसांसाठी बाहेर उपलब्ध असलेले केमिकल प्रॉडक्ट्स केसांसाठी हानिकारक असतात. त्यामुळे केस खराब होतात. अशा परिस्थितीत आम्ही तुम्हाला अशा काही घरगुती टिप्स सांगणार आहोत ज्यामुळे तुमचे केस धुतल्यानंतर खूपच चांगले होतील.


काळा चहा : टी बॅग दोन कप पाण्यात उकळा. नंतर हे पाणी केसांना चांगले लावावे. हे पाणी लावल्यानंतर दोन तासांनी केस पाण्याने धुवा. यातील कॅफिनमुळे केस गळण्याचे प्रमाण कमी होते. याच्या मदतीने तुम्ही आठवड्यातून 2-3 वेळा केस धुवू शकता.


सफरचंद साइड व्हिनेगर : तुम्ही दोन चमचे सफरचंद साइड व्हिनेगर दोन कप पाण्यात टाका. त्यानंतर शॅम्पूने केस धुतल्यानंतर या मिश्रणाने केस धुवा. यामुळे केसांमध्ये आर्द्रता टिकून राहते आणि पीएच पातळी कायम राहते आणि केसांची चमकही कायम राहते.


बेकिंग सोडा :  एका भांड्यात बेकिंग सोडा पाण्यात मिसळून पेस्ट बनवा. शॅम्पूनंतर केस धुणे खूप चांगले आहे, हे कंडिशनरपूर्वी लावा. केसांच्या मुळांना लावून मसाज करा, नंतर थंड पाण्याने धुवा आणि कंडिशन करा. यामुळे तेलकट केसांपासून सुटका मिळते.


एलोवेरा जेल :  कोरफड एलोवेरा जेल आणि पाणी चांगले मिक्स करा. त्यानंतर आठवड्यातून एकदा तरी कोरफड जेलने केस धुवा. केसांना कंडिशनिंग करण्यासाठी हा एक चांगला पर्याय आहे.


लिंबू : एक कप पाण्यात लिंबाचा रस मिसळा. त्यानंतर या पाण्याने केस धुवा. तुम्ही हे आठवड्यातून एकदा किंवा दोनदा वापरू शकता. त्यामुळे केसांची वाढ होते.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha