Health Tips : हिवाळा येताच प्रत्येकाची त्वचा कोरडी व्हायला सुरुवात होते. कारण थंड हवा आपल्या त्वचेतील आर्द्रता शोषून घेते. ज्यामुळे त्वचा कोरडी आणि निर्जीव दिसू लागते. पण, हिवाळ्याबद्दल एक चांगली गोष्ट म्हणजे या ऋतूत खाण्यापिण्याची इच्छा होते. या ऋतूत मिळणारी फळे आणि भाज्या आपल्या त्वचेसाठी आणि आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात. म्हणूनच, जर तुम्हाला तुमच्या निर्जीव आणि कोरड्या त्वचेवर चमक आणायची असेल, तर तुम्हाला फक्त हे काम करावे लागेल.
येथे आम्ही तुम्हाला अशाच 5 आरोग्यदायी पेयांबद्दल सांगणार आहोत जे तुमच्या आरोग्यासोबतच तुमच्या त्वचेसाठीही फायदेशीर ठरतील.
1. बीट ज्यूस : बीट हिवाळ्यातील सर्वात आरोग्यदायी भाज्यांपैकी एक आहे. आरोग्याच्या दृष्टिकोनातूनही याचे अनेक फायदे आहेत. तुमचा ब्लड प्रेशर कमी करण्याबरोबरच ते तुमचा स्टॅमिना देखील वाढवते आणि याच्या सेवनाने मसल मास देखील वाढतो. याशिवाय बीटचा रस प्यायल्याने तुमचे वजनही नियंत्रणात राहते. या व्यतिरिक्त, बीट तुमच्या त्वचेसाठी रामबाण उपाय आहे ज्यामुळे तुमची त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि त्याचा रस रोज प्यायल्याने तुमच्या चेहऱ्यावर ग्लोदेखील येतो.
2. गाजराचा रस : गाजर ही हिवाळ्यातील एक आरोग्यदायी भाजी आहे. त्याचा रस रोज प्यायल्याने तुमची त्वचा नैसर्गिकरित्या निरोगी राहते. गाजरांमध्ये अँटिऑक्सिडंट्स, व्हिटॅमिन सी आणि बीटा-कॅरोटीन मुबलक प्रमाणात असतात. हे आपल्या त्वचेला नैसर्गिक चमक आणते आणि त्वचेचे बाह्य नुकसान होण्यापासून संरक्षण देखील करते. तसेच, याच्या रोजच्या वापराने पचन सुधारते आणि तुमचे वजन नियंत्रित राहते.
3. काकडीचा रस : काकडी ही प्रत्येक ऋतूत उपलब्ध होणारी भाजी आहे. त्यामध्ये मुबलक प्रमाणात पाणी असते. ज्यामुळे तुमची त्वचा हायड्रेट राहते. काकडीचा रस प्यायल्याने त्वचेमध्ये कोरडेपणा येत नाही. तसेच त्वचेवर अतिरिक्त तेल जमा होत नाही, त्यामुळे पिंपल्सची समस्या उद्भवत नाही.
4. पालक रस : पालक ही हिवाळ्यातही एक आरोग्यदायी भाजी आहे. अँटीऑक्सिडंटने समृद्ध असलेली ही भाजी तुमच्या त्वचेसाठीही खूप फायदेशीर आहे, त्याचा रस प्यायल्याने त्वचेला कोणतेही नुकसान होत नाही. यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते जे आपल्या त्वचेला मदत करते.
5. टोमॅटोचा रस : काकडींप्रमाणे टोमॅटो ही प्रत्येक ऋतूत उपलब्ध असलेली भाजी आहे. टोमॅटोमध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते आणि व्हिटॅमिन सी आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. याच्या वापराने आपल्या त्वचेवर नैसर्गिक ग्लो येतो. त्याच्या वापरामुळे त्वचा कोरडीही होत नाही आणि सूर्याच्या हानिकारक किरणांपासून आपल्या त्वचेचे रक्षण होते. त्यामुळे आपली त्वचा नैसर्गिकरित्या चमकते.