Chandra Gochar : ज्योतिष शास्त्रानुसार, चंद्राला (Moon) मनाचा कारक मानलं जातं. कुंडलीत चंद्र कमजोर असल्यास व्यक्तीच्या मानसिक आरोग्यावर परिणाम होतो आणि चंद्राच्या उच्च स्थानामुळे व्यक्तीला समाजात खूप मानसन्मान मिळतो. करिअरमध्ये अपार यश मिळतं, मन शांत आणि प्रसन्न राहतं.


चंद्र हा ठराविक कालावधीनंतर राशी परिवर्तन करत असतो. त्यानुसार, 29 नोव्हेंबरला चंद्र वृषभ राशीतून बाहेर पडून मिथुन राशीत प्रवेश करणार आहे आणि 1 डिसेंबरला लगेचच कर्क राशीत प्रवेश करणार आहे. चंद्राच्या या वेगवान राशी बदलाचा चार राशींना (Zodiac Signs) मोठा लाभ होणार आहे. जाणून घेऊया या नशीबवान राशींबद्दल...


वृषभ रास (Taurus)


चंद्राची विशेष कृपा वृषभ राशीच्या जातकांवर असणार आहे. चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे आणि त्याच्या शुभ प्रभावामुळे मानसिक तणाव कमी होईल. मनातील नकारात्मक विचार पळून जातील. सुख-समृद्धी वाढेल. आरोग्यात सुधारणा होईल. पती-पत्नीमधील संबंध अधिक दृढ होतील. प्रेमप्रकरणात असाल तर प्रियकरासोबतचे प्रेमसंबंध घट्ट होतील.


कर्क रास (Cancer)


कर्क राशीला चंद्राच्या राशी बदलाचा लाभ मिळेल. कर्क राशीच्या लोकांना करिअरमध्ये प्रगतीचा योग आहे. नोकरीच्या ठिकाणी तुमच्या कामाचं कौतुक होईल. मुलांकडून एखादी चांगली बातमी मिळेल. मन प्रसन्न राहील, त्यामुळे कामात उत्साह वाटेल. कौटुंबिक सौख्य लाभेल. व्यवसायात आर्थिक लाभाची शक्यता आहे. विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीनं अभ्यास करावा आणि ज्ञान आत्मसात करावं.


तूळ रास (Libra)


चंद्रदेवांच्या कृपेमुळे तुमची करिअरमध्ये मोठी प्रगती होईल. उत्पन्नाचे नवे मार्ग सापडतील. गुंतवणुकीतून आर्थिक लाभाचा योग आहे. वारसा हक्काच्या मालमत्तेतून लाभ मिळू शकतो. नशीब तुम्हाला साथ देईल. आयुष्यातील सर्व अडथळे दूर होतील. रखडलेली कामं पूर्ण होतील. तुमचं आरोग्य ठणठणीत राहील.


धनु रास (Sagittarius)


शुभवार्ता कानी पडेल. घरात आनंदाचं आणि समाधानाचं वातावरण राहील. मानसिक तणाव दूर होईल. अनपेक्षित धनलाभाचा योग आहे. लग्न जमवण्याचा प्रयत्न करत असाल तर त्यात यश येईल. उसने दिलेले पैसे परत मिळतील. संपत्ती वाढेल. व्यवसायात प्रगतीचा योग आहे. एकंदर जीवन आनंदी असेल.


(टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.)


हेही वाचा:


Numerology 28 November 2023 : आज 'या' जन्मतारखेच्या लोकांना अचानक धनप्राप्तीचे योग; अंकशास्त्रानुसार तुमचं भविष्य काय? जाणून घ्या