Hair Care Tips : अनेकांना केस गळतीची समस्या जाणवत असते. केस गळण्यामागे अनेक कारणं असतात. शरीरामधील पोषक तत्वे कमी झाल्यानंतर देखील केस गळती ही समस्या जाणवू शकते. उन्हाळ्यात हेअर डॅमेज होतात. तसेच उन्हामध्ये बाहेर फिरल्यानंतर देखील केस गळतात. त्यामुळे उन्हाळ्यात बाहेर फिरताना टोपी घलावी. उन्हाळ्यात केसांची काळजी घेणे आवश्यक असते. 


एसीमुळे गळतात केस 
उन्हाळ्यात अनेक जण एसीचा वापर करतात. बऱ्याच वेळ एसी लावलेल्या रूममध्ये बसल्यानं केस कोरडे होतात आणि गळतात. त्यामुळे जर उन्हाळ्यामध्ये तुम्ही एसी लावलेल्या रूममध्ये बराच वेळ बसत असाल तर तुम्ही आठवड्यामधून दोन वेळा हेअर मास्क लावणे गरजेचे आहे. हेअर मास्क लावल्यानं केस गळत नाहीत. 


केस सतत धुणे 
उन्हाळ्यात घाम येत असल्यानं तसेच धुळीमुळे लोक सतत केस धुतात. केस रोज धुतल्यानं ते कमकुवत होतात. त्यामुळे दररोज केस धुण्यापेक्षा तीन ते चार दिवसानंतर केस धुवावेत. 


कोंडा होणे 
उन्हाळ्यात केसांमध्ये कोंडा होतो. उन्हाळ्यात जास्त तापमान असते. त्यामुळे केसांमध्ये बॅक्टीरिया निर्माण होतात त्यामुळे कोंडा होतो. कोंडा झाल्यानं केस गळती आणि डोक्यामध्ये खाज निर्माण होणे इत्यादी समस्या जाणवू शकतात. त्यामुळे उन्हाळ्यात अँटी डँड्रफ शॅम्पू वापरावा. अँटी डँड्रफ शॅम्पूमुळे केस गळत नाहीत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्वाच्या बातम्या :