Health Tips : भारतीय पदार्थ कोणत्याही मसाल्याशिवाय पूर्ण होत नाही. स्वयंपाकात अनेक प्रकारचे मसाले वापरले जातात. भारतीय मसाल्यांत वेगवेगळी व्हरायटी देखील पाहायला मिळते. जसे की, जिरे, काळीमिरी, हिंग, हळद, तेजपत्ता, दालचिनी इ. पण, तुम्हाला माहिती आहे का की अन्नाची चव वाढविणारे हे मसाले तुमच्या आरोग्यासाठी अनेक फायदे देतात. एकीकडे, अधिक मसालेदार अन्न खाल्ल्याने तुमची पचनशक्ती बिघडू शकते. काही मसाले स्ट्रॉंग असल्या कारणाने पोटात जळजळ, उलटी होणे यांसारखे प्रकार देखील होऊ शकतात. पण, त्याचबरोबर असे काही मसाले आहेत ज्यांचा वापर करून पोटाशी संबंधित सर्व समस्यांपासून सुटका मिळू शकते. या ठिकाणी अशा मसाल्यांबद्दल जाणून घेऊयात जे तुमची पचनशक्ती सुधारण्यास मदत करतात.


'हे' मसाले आरोग्यदायी तसेच चवदार असतात 


जिरे : जिऱ्याचा वापर फक्त टेम्परिंगसाठीच केला जात नाही तर त्याची चव आणि सुगंध तुमच्या जेवणाची चव वाढवते. यासोबतच जिरे अन्न पचवण्याचेही काम करते, त्यामुळे तुम्ही कोणतीही भाजी बनवत असाल तर नक्कीच जिरे वापरा. ​​यासाठी तुम्ही जिरे पावडर देखील वापरू शकता. जिऱ्याची पावडर अनेकजण ज्यूस बनवताना, सॅलड बनवताना देखील करतात. 
 
हिंग : जेवणाची चव वाढवण्यासाठी हिंगाची फोडणी केली जाते. परंतु, हे हिंग पोटदुखी, गॅस, अपचन यांसारख्या समस्या दूर करण्यासही मदत करते. जर तुम्हाला तुमची पचनक्रिया बरोबर ठेवायची असेल, तर तुम्ही अन्न शिजवताना हिंग घालावे. याच्या मदतीने तुम्ही अनेक प्रकारच्या आजारांपासून दूर राहू शकता. विशेषत: हिवाळ्यात लाडू बनवताना हिंगाचा वापर केला जातो. यामुळे लाडूची चव वाढते.


बडीशेप : बडीशेपचा मुखवास म्हणून सगळेच वापर करतात. परंतु, बडीशेपचा वापर इतरही अनेक पदार्थांत केला जातो. बडीशेपचा तडका देखील अनेक गोष्टींमध्ये वापरला जातो. हा मसाला चवीसोबतच पचनक्रिया बरोबर ठेवण्यास मदत करतो. म्हणूनच ते वापरणे आवश्यक आहे.


असे काही मसाले आहेत जे चवीला तर उत्तम आहेतच पण आहारात त्यांचा वापर केल्याने आपल्याला त्याचे आरोग्यदायी फायदे देखील मिळतात. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल