Fitness Tips : निरोगी शरीरासाठी योग्य आहार (Food) आणि नियमित व्यायाम (Excercise) करणं गरजेचं आहे. जर तुम्ही या सवयी पाळल्या तर तुम्ही अनेक आजारांपासून दूर राहू शकता. शारीरिक आरोग्याबरोबरच योगाभ्यास (Yoga) मानसिक आरोग्यासाठीही फार गरजेचा आहे. योग करताना त्यामध्ये अनेक आसनं असतात. या प्रत्येक आसनाचे वेगवेगळे फायदे आहेत. सूर्यनमस्कार ही एक अशी प्रक्रिया आहे ज्यामध्ये एकाच वेळी 12 आसनं केली जातात. याचा शरीराला खूप फायदा होतो. पण, सूर्यनमस्कार करताना काही गोष्टी लक्षात ठेवणं गरजेचं आहे.  


जे लोक नियमितपणे सूर्यनमस्कार करतात त्यांच्या आरोग्याला खूप फायदे मिळतात. जर तुम्ही सूर्यनमस्कार सुरू करत असाल तर ते करण्यापूर्वी काही गोष्टी जाणून घेणं गरजेचं आहे, कारण या दरम्यान झालेल्या चुकांमुळे तुम्हाला फायदा होण्याऐवजी नुकसान होऊ शकते.


चतुर्दंडासन करताना झालेल्या चुकीमुळे वेदना वाढू शकतात


चतुर्दंदासन हे सूर्यनमस्कार दरम्यान केलं जाणारं आसन आहे. अनेकजण हे आसन करताना काही सामान्य चुका करतात. जसे की, खांद्यावर जास्त दाब देणे, नितंब वर करणे. यामुळे, तुमच्या पाठीच्या आणि खांद्याच्या स्नायूंमध्ये वेदना होऊ शकतात.


श्वासावर नियंत्रण न राखणे 


सूर्यनमस्कारामध्ये शारीरिक आसनासह श्वासोच्छवासाचा समतोल राखणं फार गरजेचं आहे. जर तुमचं श्वासोच्छवासावर नियंत्रण नसेल तर तुमचं नुकसान होऊ शकतं. सूर्यनमस्काराच्या 12 आसनांपैकी हस्त उत्तानासन दोनदा केले जाते. अनेक वेळा लोक ते एकदा वगळतात, त्यामुळे श्वासोच्छवासाचे संतुलन बिघडते. त्यामुळे जर तुम्हाला सूर्यनमस्कार सुरू करायचे असतील तर तुम्ही तज्ज्ञांचा सल्ला घेऊ शकता.


शरीराला जबरदस्तीने ढकलणे


सूर्यनसमस्कार करताना त्यामध्ये 12 आसनं केली जातात. त्यामुळे सुरुवातीला ही सर्व योगासनं करताना कंटाळा येतो किंवा थकवा लागतो. अश वेळी शरीरावर जबरदस्ती करू नका. स्नायूंना ताण येऊ शकतो. हळूहळू सर्व योगासनं करा. 


सूर्यनमस्काराचे फायदे


दररोज सूर्यनमस्कार केल्याने शरीर पूर्णपणे तंदुरुस्त राहण्यास मदत होते. कारण यामध्ये एकामागून एक आसने केली जातात, ज्यामुळे कॅलरीज बर्न करण्यासही मदत होते आणि तुम्ही वजन नियंत्रणात ठेवू शकता. यामुळे तुमच्या शरीरात लवचिकता येते आणि पाठीचा कणा, मान इत्यादी दुखण्यापासून आराम मिळतो आणि तणावही कमी होतो.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : 'या' पदार्थांतून शरीराला मिळतात हेल्दी फॅट; वजन कमी करण्यासाठी खूप उपयुक्त