Health Tips : निरोगी शरीरासाठी योग्य आहार (Food) गरजेचा आहे. पण, फक्त योग्य आहार असून चालत नाही तर त्या आहाराचं योग्य पचन होणं देखील गरजेचं आहे. शरीरात असलेल्या आतड्यांचे कार्य निरोगी पदार्थांचे पचन करणे आहे. याशिवाय पोषकद्रव्ये शोषून शरीरात पोहोचविण्याचे कामही पचनसंस्थेद्वारे केले जाते. पण, खाण्याच्या चुकीच्या सवयींमुळे पचनामध्ये खूप समस्या निर्माण होतात. जिवाणूंच्या संपर्कात आलेले अनहेल्दी अन्न किंवा पाणी प्यायल्याने इन्फेक्शन होऊ शकते.


बहुतेक लोकांना पोटात संसर्ग (Stomach Infection) झाल्याची माहिती नसते. या कारणासाठी, अनेकदा लोकांना काय खावं आणि काय खाऊ नये हे समजत नाही. यासाठीच पोटात संसर्ग झाल्यानंतर कोणत्या पदार्थांचं सेवन करावं आणि कोणत्या पदार्थांचं सेवन करू नये या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.  


'ही' आहेत पोटाचा संसर्ग होण्याची लक्षणं


पोटाच्या संसर्गामुळे उलट्या होणे, जुलाब होणे, जळजळ होणे यांसारख्या समस्या उद्भवू शकतात, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. अशा परिस्थितीत आपल्या खाण्याच्या सवयींची विशेष काळजी घ्या. अनेकदा या काळात लोक काही गोष्टी खातात ज्यामुळे तुमच्या आरोग्याला नुकसान पोहोचते.


'या' गोष्टी खा


दही (Curd) :


पोटात संसर्ग झाल्यास तुम्ही दही खाऊ शकता. यामध्ये आढळणारे प्रोबायोटिक्स पचन व्यवस्थित ठेवण्यास मदत करतात. याशिवाय, तुम्ही ताक देखील पिऊ शकता, ते शरीराला हायड्रेट ठेवण्यास मदत करते.


सूप (Soup) :


भाज्यांपासून बनवलेले सूप देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर ठरू शकते. सूपमध्ये नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आढळतात जे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहेत.


फळे (Fruit) :


याशिवाय, तुम्ही अगदी ताजी आणि सहज पचणारी फळे खाऊ शकता. पोटात इन्फेक्शन झाल्यास केळी, द्राक्षे, संत्री खाऊ शकता.


काय खाऊ नये?


कॅफिन असलेल्या गोष्टी (Say NO to Caffeine)


तज्ञांच्या मते, कॅफिन असलेल्या गोष्टींचे सेवन करू नका. कोल्ड्रिंक्स, चहा-कॉफीचे सेवन आरोग्यासाठीही हानिकारक ठरू शकते.


जंक फूड (Junk Food)


याशिवाय, जंक आणि प्रक्रिया केलेले अन्न देखील आरोग्यास नुकसान पोहोचवू शकतात. पोटाची समस्या असल्यास जंक फूड खाऊ नका.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Gift Ideas For Children : मुलांचं नवीन वर्ष खास बनवायचंय? 'हे' द्या बेस्ट गिफ्ट ऑप्शन्स; आजच खरेदी करा