Gift Ideas For Children : नवीन वर्ष (Happy New Year) अवघ्या काही दिवसांत सुरु होणार आहे. नवीन वर्षाची उत्सुकता लहानांपासून ते मोठ्यांपर्यांत सर्वांनाच असते. प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने नवीन वर्ष सेलिब्रेट करतात. मात्र, हे नवीन वर्ष लहान मुलांसाठी अधिक खास आणि उत्सुकतेचं असतं. या वर्षाचं स्वागत करताना तुम्हाला जर तुमच्या मुलांचा उत्साह कायम ठेवायचा असेल तर त्यांच्यासाठी काही खास गिफ्ट्स ऑप्शन्स तुम्ही देऊ शकता यामुळे त्यांचा आनंद दुप्पट होईल. 


यंदाच्या नवीन वर्षाला तुम्हाला जर मुलांसाठी भेटवस्तू खरेदी करू इच्छित असल्यास, बरेच गिफ्ट ऑप्शन्स उपलब्ध आहेत. मुलांना गिफ्ट्स देताना त्यांच्या भविष्याच्या दृष्टीने उपयोगी पडतीन अशा गिफ्ट्सची निवड करा. नवीन वर्षात मुलांना तुम्ही कोणते गिफ्ट्स देऊ शकता या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


पुस्तकं भेटवस्तू द्या 


मुलांना त्यांच्या वयानुसार पुस्तके भेट दिली, तर त्यांच्यासाठी यापेक्षा चांगले दुसरे काहीही असू शकत नाही. यासाठी मुलांना नेहमी अभ्यासाचीच पुस्ततं द्यायला हवीत हे गरजेचं नाही. तुम्ही त्यांना त्यांच्या आवडीनुसार कॉमिक बुक्स, स्टोरी बुक्स किंवा पुस्तके भेट देऊ शकता. त्यामुळे त्यांचे वाचन कौशल्य सुधारेल आणि वाचनात आवड निर्माण होईल. 


आर्ट आणि क्राप्ट किट भेट द्या 


अभ्यासाबरोबरच मुलांना क्रिएटीव्हिटी देणं खूप गरजेचं आहे. अशा परिस्थितीत तुम्ही त्यांना आर्ट अँड क्राफ्ट किट देऊ शकता. यामध्ये तुम्ही मुलाला त्याच्या वयानुसार डाय क्राफ्ट किट आणि पेंटिंग कलर्स यांसारख्या वस्तू भेट देऊ शकता. जर मुलाला आधीपासूनच कलेमध्ये रस असेल तर त्याच्यासाठी हा सर्वोत्तम पर्याय आहे.


म्युझिकल इन्स्ट्रूमेंट भेट द्या 


तुमच्या मुलाला संगिताची आवड असेल तर तुम्ही त्याला त्याच्या वयानुसार म्युझिकल इन्स्ट्रूमेंट देऊ शकता. यामध्ये तुम्ही त्यांना म्युझिक कीबोर्ड किंवा रिदम इन्स्ट्रुमेंट गिफ्ट करू शकता.


आऊटडोर एक्टिव्हिटी गिफ्ट द्या 


आजकाल मुलं आपला जास्तीत जास्त वेळ मोबाईल फोन वापरण्यात घालवतात. अशा परिस्थितीत, आपल्या मुलाला मैदानी खेळ खेळण्यास प्रोत्साहित करा. ज्यासाठी तुम्ही त्यांना बॅट-बॉल, गार्डन किट, बॅडमिंटन अशा गोष्टी देऊ शकता. 


नेचर किट द्या 


नवीन काहीतरी शिकण्यासाठी तुम्ही मुलाला विज्ञान प्रयोग किट, निसर्ग सर्च किट आणि दुर्बिणीसारख्या गोष्टी भेट देऊ शकता.


महत्त्वाच्या बातम्या :


Travel Tips : नवीन वर्षात फिरायचा प्लॅन करताय? फक्त दोन हजारात 'या' ठिकाणी फिरण्याचा आनंद घ्या!