Health Tips : ड्रायफ्रूट्स (Dry Fruits) आपल्या शरीराला खूप फायदे देतात. याच ड्रायफ्रूट्सपैकी मनुका (Raisin) हा देखील शरीरासाठी तितकाच महत्त्वाचा आहे. गोड पदार्थात मनुका वापरल्याने त्या पदार्थाची चव तर वाढतेच पण शरीराला पोषणही मिळते. मनुका आपल्या शरीरासाठी फायदेशीर तर आहेच, पण मनुक्याचं पाणीही आपल्या आरोग्यासाठी फार गुणकारी आहे. हे पाणी रोज प्यायल्यास अनेक समस्यांपासून सुटका मिळेल. चला तर जाणून घेऊयात मनुक्याच्या पाण्याचे फायदे.
मनुक्याच्या पाण्याचे फायदे
मनुक्यामध्ये अल्कधर्मी जास्त प्रमाणात असते. जे शरीरात तयार होणार्या ऍसिडवर नियंत्रण ठेवण्याचे काम करते. हे खाल्ल्यानंतर अॅसिडिटीच्या समस्येपासून सुटका मिळते.
मनुक्यामध्ये भरपूर प्रोटीन असतात. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होते. याच कारणामुळे मनुक्याला इम्युनिटी बूस्टर असेही म्हणतात.
ज्यांना उच्च रक्तदाबाचा त्रास आहे त्यांनी मनुक्याचे पाणी प्यावे. मनुक्याच्या पाण्यामुळे तुमचा बीपी नियंत्रणात राहतो.
ज्या लोकांमध्ये हिमोग्लोबिनची कमतरता आहे त्यांनी दररोज सकाळी रिकाम्या पोटी मनुका आणि त्याचे पाणी घ्यावे. कारण त्यात भरपूर लोह असते. त्यामुळे चेहऱ्याचा ग्लो देखील वाढतो.
मनुकामध्ये व्हिटॅमिन सी आणि लोह मुबलक प्रमाणात आढळते. ज्यामुळे केस आणि त्वचा चांगली होते. निरोगी त्वचा आणि केसांसाठी, दररोज रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्यावे.
मनुक्याच्या पाण्याचे तोटे
मनुक्याचे पाणी जास्त प्यायल्याने डायरिया आणि गॅसची समस्या होऊ शकते.
मधुमेहाच्या रुग्णांनी मनुके विचारपूर्वक खावे. कारण त्यामुळे टाईप-2 मधुमेहाच्या रुग्णांच्या समस्या वाढू शकतात.
मनुक्याचे पाणी काही लोकांसाठी फायदेशीर नसेल तर त्यांना ऍलर्जीचा त्रास होऊ शकतो.
मनुक्याचे पाणी बनवण्याची आणि पिण्याची पद्धत
पाणी - 200 मिली
मनुका - 80 ते 90 ग्रॅम
एका भांड्यात पाणी उकळा आणि नंतर त्या गरम पाण्यात मनुका रात्रभर भिजवा.
सकाळी मनुके काढून बाजूला ठेवा आणि नंतर पाणी हलके गरम करा. नंतर काही वेळाने ते प्या.
रोज सकाळी रिकाम्या पोटी मनुक्याचे पाणी प्या. हे पाणी शरीरातील घाण काढून टाकण्याचे काम करते. हा घरगुती उपाय तुमच्या उपयोगी येईल.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :