Health Tips : तसं पाहायला गेलं तर सर्वच फळं आपल्या आरोग्यासाठी (Health) अत्यंत गुणकारी असतात. पण, डाळिंब (Promgranates) हे एक फळ आहे ज्यामध्ये प्रथिने, जीवनसत्त्वे, कॅल्शियम, पोटॅशियम यांसारखे अनेक पोषक आणि अँटिऑक्सिडंट असतात. आपल्या शरीराला रोगप्रतिकारक (Immunity System) शक्ती वाढविण्यासाठी, हाडांची मजबुती, योग्य पचन आणि मज्जासंस्थेचे चांगले कार्य यासाठी या सर्व पोषक तत्वांची गरज असते. पण, आजकाल आपल्या बिघडत चाललेल्या जीवनशैलीचा (Lifestyle) परिणाम आपल्या आपोग्यावर होऊ लागला आहे आणि त्यामुळे शरीराला पोषक तत्त्वांची कमतरता भासते.
या संदर्भात याबाबत डॉ. दीक्षा भावसार सावलिया यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर केली आहे. ज्यामध्ये त्यांनी डाळिंबाचे फायदे सांगितले आहेत.
निरोगी आयुष्य जर जगायचं असेल तर त्यासाठी फिट राहणं फार गरजेचं आहे. पण, आजच्या काळात तणावातून मुक्त होण्यासाठी लोक अनेक अनहेल्दी पदार्थांचं सेवन करतात. तसेच, वेळेअभावी नियमित जिमलाही जाणं होत नाही. आणि त्यामुळेच याचा आपल्या शरीरावर विपरित परिणाम होतो.
डाळिंब खाण्याचे फायदे नेमके कोणते?
डाळिंब खाल्ल्याने शुक्राणूंची संख्या आणि गुणवत्ता सुधारते. हे आफ्रिकन फळ आहे. डाळिंब खाल्ल्याने लैंगिक इच्छा वाढते. प्रजननक्षमतेच्या समस्येने त्रस्त असलेल्यांनी याचे सेवन करावे.
- हार्मोनल समस्यांनी त्रस्त महिलांसाठीही हे फळ खूप फायदेशीर आहे. हे खाल्ल्याने PCOS, प्रजनन क्षमता, केस गळणे, मुरुम इत्यादी अनेक समस्या दूर होतात.
- उच्च रक्तदाबाच्या रुग्णांनी डाळिंब जरूर खावे. त्यामुळे हृदय निरोगी राहते. आणि शरीरातील कोलेस्ट्रॉलचे प्रमाण कमी होते.
- अतिसार, इरिटेबल बोवेल सिंड्रोम किंवा अल्सरेटिव्ह कोलायटिसच्या रुग्णांसाठीही हे फळ खूप फायदेशीर आहे.
- अँटिऑक्सिडंटने समृद्ध असल्याने, डाळिंब मुक्त रॅडिकल्स, जळजळ यांसारख्या समस्यांना तोंड देण्यासाठी सुद्धा डाळिंब गुणकारी आहे.
- सर्वात महत्त्वाचं म्हणजे डाळिंब खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहते.
- या सर्वांशिवाय डाळिंब खाल्ल्याने पचनक्रियाही सुधारते, म्हणजेच या एका फळाने शरीराला अनेक फायदे मिळू शकतात.
जर तुम्हाला सुद्धा डाळिंब हे फळ आवड नसेल तर वेळीच या फळाचं सेवन करायला सुरुवात करा.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आाजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या