Women Health Tips : मासिक पाळी (Periods) दरम्यान बहुतेक मुलींचे मूड स्विंग्सल होतात. कधी मुलींचा मूड खूप आनंदी असतो तर कधी विनाकारण चिडचिड होते. कधी काहीतरी खायची इच्छा होते तर कधी भूकच नाही लागत. मुलींच्या शरीरातील हे सर्व बदल हार्मोनल बदलांमुळे होतात. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन नावाची हार्मोन्स मासिक पाळीच्या दरम्यान मूडवर परिणाम करतात. त्यामुळे मुलींचा मूड वारंवार बदलत राहतो. पीरियड्सच्या काळात या हार्मोन्सची पातळी अस्थिर होते. त्यामुळे त्यांचे मूड स्विंग्स होतात. प्रोजेस्टेरॉन आणि इस्ट्रोजेन हार्मोन्स पीरियड्स दरम्यान मूडमधील चढउतार आणि रागासाठी जबाबदार असतात. 


राग येण्याची आणखी काही कारणे जाणून घेऊयात


मासिक पाळीच्या काळात महिलांना जास्त राग येण्याची अनेक कारणे आहेत. पहिलं कारण म्हणजे या काळात हार्मोन्समध्ये चढ-उतार होतात, ज्यामुळे मूड स्विंग होतात. दुसरं कारण म्हणजे, पोटदुखी आणि पोटात जळजळ होणे यामुळे शारीरिक अस्वस्थता येते. ज्यामुळे राग येतो. तिसरं कारण म्हणजे सामाजिक उपक्रमात सहभागी होण्यात अस्वस्थता वाटते. चौथं कारण म्हणजे झोप न लागणे. या सर्व कारणांमुळे मासिक पाळीच्या वेळी जास्त चिडचिड होते.


दररोज व्यायाम करा 


व्यायाम आणि ध्यान केल्याने शरीरातील हार्मोन्स सुधारतात, ज्यामुळे मूड देखील चांगला राहतो. दररोज किमान 30 मिनिटे चालणे किंवा काही हलका व्यायाम करा. जसे की, धावणे. यामुळे शरीर तंदुरुस्त राहते.


बाहेर जा


मासिक पाळीच्या दरम्यान असा अर्थ अजिबात नाही की संपूर्ण वेळ अंथरूणातच राहावं लागणं. तुम्ही सतत अंथरुणावर राहिल्यास तुमचा मूड खराब होऊ शकतो. मासिक पाळीच्या काळातही तुम्ही बाहेर जाऊ शकता. फिरायला जाऊ शकता. मित्र-मैत्रीणींना भेटू शकता. याचा मनावर सकारात्मक परिणाम होईल आणि मूड स्विंगही कमी होईल. 


जंक फूड खाऊ नका


मासिक पाळीच्या काळात अनेक वेळा आपण स्वतःचे मनोरंजन करण्यासाठी पिझ्झा, बर्गर, केक इत्यादी जंक फूड खाण्याचा प्रयत्न करतो. पण हे करू नये. अशा परिस्थितीत जर आपण जंक फूड खाल्ले तर शरीरातील द्रवपदार्थाचे प्रमाण खूप वाढेल. ज्यामुळे सूज येणे, वजन वाढणे आणि इतर समस्या निर्माण होतील.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील