Green Tomato Health Benefits: टोमॅटो हा असा घटक आहे, जो कोणत्याही पदार्थाची चव वाढवतो. टोमॅटो सलाड म्हणूनही खाल्ला जातो. टोमॅटोची चटणी, सूप किंवा ज्यूस अशा इतर अनेक प्रकारे लोक याचे सेवन करतात. बहुतेक लोक लाल टोमॅटोला त्यांच्या आहारात सामील करतात. परंतु, तुम्ही हिरव्या टोमॅटोचे (Green Tomato) नाव ऐकले आहे का? हिरव्या टोमॅटोमध्येही भरपूर पोषक घटक असतात. यामध्ये व्हिटॅमिन सी, ए, कॅल्शियम, पोटॅशियम आणि इतर महत्त्वाचे अनेक घटक आढळतात. हिरव्या टोमॅटोचे योग्य प्रमाणात सेवन केल्याने प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत होते. चला जाणून घेऊया हिरवा टोमॅटो खाण्याचे फायदे...


ब्लड प्रेशर : खराब जीवनशैलीमुळे आजकाल बहुतेक लोकांना उच्च रक्तदाबाची समस्या असते. यासाठी ते औषधेही घेतात. अशा परिस्थितीत हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो. त्यामध्ये आढळणाऱ्या पोटॅशियममुळे रक्तदाब नियंत्रित ठेवता येतो.


रोगप्रतिकार शक्ती : कोविड-19च्या काळात रोगप्रतिकारशक्तीचे महत्त्व काय आहे, हे आपल्या सर्वांनाच कळले आहे. अशा परिस्थितीत, बहुतेक लोक रोग प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करत आहेत. प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी तुम्ही हिरव्या टोमॅटोची मदत घेऊ शकता. हिरव्या टोमॅटोच्या सेवनाने शरीरातील व्हिटॅमिन सीची कमतरता पूर्ण करून रोगप्रतिकारशक्ती वाढवता येते.


डोळ्यांचे आरोग्य : हिरव्या टोमॅटोमध्ये बीटा-कॅरोटीन असते, जे डोळ्यांसाठी खूप महत्त्वाचे मानले जाते. बीटा कॅरोटीनमुळे डोळे निरोगी ठेवण्यासोबतच दृश्यमानही सुधारते. यासाठी तुम्ही रोज हिरव्या टोमॅटोचे सेवन करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


संबंधित बातम्या :



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha