Health Tips : तुम्हालाही दिवसभर मोबाईल (Mobile) हातात घेऊन बसायची सवय आहे? तर वेळीच सावध व्हा. कारण मोबाईलच्या वाढत्या वापरामुळे तुमच्या डोळ्यांवर (Eyes) परिणाम होऊ शकतो यामुळे तुमची दृष्टीही हिरावून घेतली जाऊ शकते. आरोग्य तज्ज्ञ स्मार्टफोनच्या दुष्परिणामांबाबतही अनेकदा माहिती देतात. कारण त्याच्याशी संबंधित समस्या खूपच गंभीर आहेत. मोबाईलचा जास्त वापर केल्याने आरोग्याशी संबंधित अनेक समस्या उद्भवू शकतात. तज्ज्ञांच्या मते, मोबाईल स्क्रीनच्या जास्त वेळ संपर्कात राहणे धोकादायक आहे. त्यामुळे लहान मुलांमध्ये ग्लूकोमा आजार झपाट्याने वाढत आहे. याच संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात की मोबाईलचा जास्त वापर करणे आपल्यासाठी धोकादायक का आहे.
 
स्मार्टफोनपासून डोळ्यांचे रक्षण करा


मोबाईल जास्त वेळ वापरल्याने डोळ्यांच्या दृष्टीवर नकारात्मक परिणाम होतो. त्यामुळे डोळ्यांना कोरडे पडण्याची (Dryness of Eyes) समस्या उद्भवू शकते. तुमच्या या सवयीमुळे ग्लूकोमाचा धोकाही वाढू शकतो, ज्यामुळे तुम्हाला अंधत्वही येऊ शकते. पडद्यातून निघणारे ब्लू लाईट्स डोळ्यांसाठी धोकादायक असतात.
 
लक्ष केंद्रित करण्यात अडचण


आरोग्य तज्ज्ञांच्या मते, स्मार्टफोनचे आभासी जग तुमचे मन विचलित करू शकते. त्याचा तुमच्या मनावर वाईट परिणाम होऊ शकतो. यामुळे संभ्रमही निर्माण होऊ शकतो. अशी मुले मोबाईल फोनवर जास्त वेळ घालवतात आणि अभ्यासावर नीट लक्ष केंद्रित करू शकत नाहीत.
 
मानसिक आरोग्यावर परिणाम


स्मार्टफोनवर व्हिडीओ गेम्स आणि इतर अॅप्सचा अतिवापर केल्याने मुलांमध्ये तणाव आणि नैराश्य वाढू शकते. याचा मानसिक आरोग्यावर वाईट परिणाम होऊ शकतो. फोनचा सतत वापर केल्याने डोकेदुखी आणि मायग्रेनचा धोका वाढू शकतो. त्यामुळे मेंदू चांगला ठेवण्यासाठी स्क्रीन टाईम कमी करायला हवा.
 
स्मार्टफोनबाबत सूचना


मोबाईलच्या धोक्यांबाबत तज्ज्ञ अनेकदा त्यापासून दूर राहण्याचा सल्ला देतात. त्याचे दीर्घकालीन विपरीत परिणाम दिसू शकतात, असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे रात्री झोपण्यापूर्वी साधारण एक तास आधी स्क्रीन लावणे टाळावे. याशिवाय मोबाईलचा वापर करताना डोळ्यांना चष्मा लावा. जेणेकरून डोळ्यांना होणारे नुकसान होण्यापासून वाचवता येईल. अशी काळजी घेतल्यास तुमचे डोळे लवकर खराब होणार नाहीत.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : 'या' आजारांपासून स्वतःचं संरक्षण करायचं असेल तर स्तनपान नक्की करा; आई आणि बाळ दोघांसाठीही फायदेशीर