Health Tips : सध्या लहान मुलांमध्ये (Children) मोबाईल वापराचे प्रमाण मोठ्या संख्येने दिसून येतंय. अगदीच पाहायला गेलो तर 7 ते 8 महिन्याच्या बाळांना सुद्धा जेवणाच्या वेळी मोबाईल हवा असतो. नाहीतर मुलं जेवत नाहीत. 7-8 महिन्याच्या बालकांपासून तर 18 वर्ष वयोगटातील मुलांना मोबाईलची आवश्यकता नसतानाही तासन्तास त्यांच्या हातात मोबाईल हवा असतो. आणि ह्या सगळ्याला कुठेतरी पालक देखील तेवढ्याच प्रमाणात जबाबदार आहेत. परिणामी मुलांना लहान वयातच चष्मा लागतो. मुलांच्या मोबाईलच्या अतिवापरामुळे शरीराला नेमके कोणते नुकसान होते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात.
पालकांनी 'या' गोष्टींची काळजी घ्यावी
सध्याच्या काळात तर ऑनलाईन अभ्यासाच्या नावाखाली मुलांमध्ये मोबाईलमध्ये गेम खेळणं, व्हिडीओ बघणे, मित्र मैत्रिणींबरोबर चॅटिंग करणे ह्या गोष्टींचे प्रमाण वाढलेलं दिसून येतंय. यात विशेष म्हणजे पालकांचे मुलांकडे दुर्लक्ष होतंय. मुले मोबाईलचा वापर योग्य गोष्टींसाठी करतायेत का? याकडे पालकांनी लक्ष देणं गरजेचं आहे. नाहीतर त्यांना ह्या छोट्या चुकीचे पुढे मोठे दुष्परिणाम भोगावे लागू शकतात.
मोबाईलचा अति वापर करण्याचे दुष्परिणाम
मोबाईलच्या अती वापरामुळे त्याचा थेट परिणाम मुलांच्या मेंदूवर, डोळ्यांवर होत असतो. आणि मग डोकेदुःखी, डोळ्यांतून पाणी येणे, अशा समस्या उद्भवू शकतात. यामुळे मुलांना चष्मा देखील लागू शकतो. सध्या लहान मुलांमध्ये मुख्यता चष्म्याचे प्रमाण वाढण्याचे कारण म्हणजे ऑनलाईन शिक्षण आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे मुले तासन्तास मोबाईल घेऊन बसत असल्याने चष्म्याचे प्रमाण हे वाढलेले दिसून येतंय. तज्ञांच्या दिलेल्या माहितीतून असे समजले की, लॉकडाऊनच्या काळात सर्वच घरी बसून होते. त्यामुळे त्यांच्या करमणुकीचे साधन म्हणजे मोबाईल, टि.व्ही हेच होते. याचा अती वापर झाल्याने त्याचा परिणाम हा मुलांच्या डोळ्यांवर झाल्याचे सांगण्यात येते.त्यामुळे चष्मा लागण्याचे प्रमाण देखील वाढत चालले आहे. यात 45 च्या पुढील वयोगटातील लोकांचा देखील समावेश आहे. जी मुले ऑनलाईन अभ्यास करतात, अशा मुलांना चष्मा असल्यास त्यांनी ब्ल्यूक्ट ह्या चष्म्याच्या ग्लासेस वापरण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला आहे. तसेच दरोज गार पाण्याने डोळे धुवावेत. त्याच बरोबर काकडी, गाजर, बीट या फळांचे सेवन केल्यास तुमच्या डोळ्यांचे आरोग्य उत्तम राहण्यास मदत होईल.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Hypertension : हिवाळ्यात रक्तदाब का वाढतो? जाणून घ्या त्याची कारणे आणि प्रतिबंध करण्याच्या पद्धती