Health Tips : मुलांच्या वयानुसार उंची न वाढणे ही एक सामान्य समस्या आहे. आपल्या मुलाची उंची त्यांच्या मित्रांपेक्षा कमी का वाढत आहे याची पालकांना अनेकदा काळजी वाटते. अशा वेळी मुलांची उंची न वाढण्यामागे कोणकोणत्या उणिवा असू शकतात हे सर्वात आधी समजून घेणे गरजेचे आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, मुलांमध्ये सर्वात मोठी कमतरता म्हणजे व्हिटॅमिन डी आणि कॅल्शियमची आहे. हे दोन्ही हाडे आणि स्नायूंसाठी खूप महत्वाचे आहेत. त्यांच्या कमतरतेमुळे मुलांचा शारीरिक विकास योग्य प्रकारे होत नाही. विशेषतः उंची वाढण्यात अडथळे येतात. या दोन जीवनसत्त्वांबद्दल आणि त्यांच्या कमतरतेवर मात करण्याचे उपाय नेमके कोणते या संदर्भात अधिक माहिती जाणून घेऊयात. 


व्हिटॅमिन डीची कमतरता 


व्हिटॅमिन डी हे एक अतिशय महत्वाचे जीवनसत्व आहे जे आपल्याला सूर्यप्रकाशातून मिळते. हाडे आणि दातांसाठी खूप फायदेशीर आहे. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमुळे मुलांच्या शरीरात अनेक समस्या उद्भवू शकतात. व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा सर्वात जास्त परिणाम हाडांवर होतो. हाडांचा विकास नीट न झाल्यास मुलांच्या उंचीवरही परिणाम होतो. शरीरात ‘ड’ जीवनसत्त्व कमी असल्याने मुलांची हाडे पुरेशी मजबूत होत नाहीत. यामुळे उंची वाढण्यास अडथळा येतो आणि कधीकधी वाकड्या उंचीची समस्या देखील उद्भवू शकते. त्यामुळे, मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश देणे आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार देणे खूप महत्वाचे आहे. तरच त्याची उंची त्याच्या वयानुसार योग्य असेल. 


कॅल्शियमची कमतरता 


कॅल्शियम हे एक खनिज आहे जे हाडे आणि दातांसाठी खूप महत्वाचे आहे. बालपणात आपली हाडे आणि दात खूप वेगाने विकसित होतात आणि या काळात कॅल्शिअमची नितांत गरज असते. जेवणात कॅल्शियमचे प्रमाण कमी असल्यास मुलांच्या शरीरात कमतरता निर्माण होऊ शकते. त्यामुळे हाडांचा विकास व्यवस्थित होत नाही आणि मुलांची उंचीही हळूहळू वाढते. काही प्रकरणांमध्ये उंची अजिबात वाढत नाही. त्यामुळे मुलांची उंची निरोगी राहावी यासाठी कॅल्शियम युक्त आहार देणे अत्यंत आवश्यक आहे. त्यामुळे, मुलांना पुरेसा सूर्यप्रकाश देणे आणि व्हिटॅमिन डी समृद्ध आहार देणे खूप महत्वाचे आहे. तरच त्याची उंची त्याच्या वयानुसार योग्य असेल. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : जेवणानंतर रक्तातील साखर 300 पार जाते? फक्त 'या' 5 गोष्टी करा; साखरेची पातळी नियंत्रित राहील