Health Tips : सुंदर दिसणं आणि राहणं कोणाला नाही आवडत. मुलींना तर सौंदर्याच्या बाबतीत नेहमी नेटकेपणा हवा असतो. त्यातही मुलींना लांब नखं फार आवडतात. त्यांना अधिक आकर्षक बनवण्यासाठी त्या नेल आर्ट आणि विविध प्रकारचे नेल पेंट लावतात. पण काही स्त्रिया त्यांची नखे हवी तशी वाढवत नाहीत. त्यांची नखे इतकी कमकुवत असतात की ती वारंवार तुटत राहतात आणि चांगली दिसतही नाहीत. पण असं का होतं याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?
खरंतर, यामागे आपल्या आरोग्याशी संबंधित कारणे असू शकतात. असे अनेक आजार आहेत ज्यामुळे नखे निर्जीव होतात आणि तुटायला लागतात.
नखे तुटण्यामागे 'ही' कारणे असू शकतात
1. वाढते वय
जसजसे वय वाढते तसतसे नखांच्या वाढीवर त्याचा परिणाम दिसू लागतो. अशा स्थितीत नखे खडबडीत आणि कमकुवत होऊ लागतात.
2. पाण्यात जास्त वेळ हात ओले ठेवणे
कपडे, भांडी धुणे किंवा वारंवार हात धुणे असे कोणतेही काम ज्यामध्ये तुमचे हात बराच वेळ पाण्यात राहतील, तर त्याचा परिणाम तुमच्या नखांवर होतो.
3. काही रोगांमुळे
एक्जिमा, सिरोसिस आणि लाइकेन प्लॅनससारख्या काही आजारांमुळे नखे सहज कमकुवत होऊ शकतात आणि तुटतात. हायपोथायरॉईडीझम हे देखील याचे कारण असू शकते.
4. लोहाची कमतरता
शरीरात लोहाची कमतरता असेल तर त्यामुळे नखे कमकुवत होऊन तुटायला लागतात. जर तुमच्या नखांमध्ये विशिष्ट आकार दिसत असेल तर तुम्ही तुमची लोहाची पातळी एकदा तपासून पहा.
5. हानिकारक रसायने
बऱ्याच मुलींना नेहमी नेलपेंट लावायला खूप आवडते. पण त्यात असलेली हानिकारक रसायने आपल्या नखांनाही हानी पोहोचवतात.
नखांची काळजी कशी घ्यावी?
सर्वात आधी, तुम्हाला तुमचे नखे तुटण्याचे कारण शोधावे लागेल जेणेकरुन तुम्ही ते कमी करू शकाल. नखे मॉइस्चराइज करा. यासाठी तुम्ही नखांवर क्रीम, सीरम आणि खोबरेल तेल लावू शकता. रात्री झोपण्यापूर्वी खोबरेल तेल किंवा ऑलिव्ह ऑईलने नखांना मसाज करा. जर तुम्ही स्वयंपाकघरात बराच वेळ काम करत असाल आणि या काळात तुमचे हात बराच वेळ पाण्यात राहिल्यास तुम्ही सिलिकॉनचे हातमोजे घालून काम करू शकता. हे हातमोजे तुमची त्वचा आणि नखे दोन्ही सुरक्षित ठेवतील.