Health Tips : महिलांनी (Women) आपल्या आरोग्याकडे (Health) लक्ष देणं गरजेचं आहे. जरी हा हार्मोन शरीरात कमी प्रमाणात आढळत असला तरीही, त्याच्या कमतरतेमुळे अनेक समस्या उद्भवू शकतात. त्याचे कमी प्रमाण विशेषत: स्त्रियांमध्ये अनेक गैरसोयींना कारणीभूत ठरतात. हा हार्मोन स्त्रियांमध्ये उच्च प्रमाणात तयार होत असला तरी, गर्भधारणेदरम्यान आणि रजोनिवृत्ती दरम्यान इस्ट्रोजेन हार्मोनची (Estrogen Hormone) कमतरता दिसून येते.
हा हार्मोन शरीराचे एकंदर आरोग्य राखण्यात मोठी भूमिका बजावतो. याच्या कमतरतेमुळे महिलांमध्ये डोकेदुखी, तणाव, अनियमित मासिक पाळी यांसारख्या समस्या दिसून येतात. याशिवाय कमकुवत हाडे, चिंता, नैराश्य आणि कोरडी त्वचा यासाठीही ते जबाबदार असतात. अशा वेळी आम्ही शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही खास टिप्स सांगणार आहोत.
नियमित व्यायाम करा
तुमच्या दिनचर्येत व्यायामाचा समावेश करून तुम्ही शरीरातील इस्ट्रोजेनची पातळी वाढवू शकता. त्याच्या कमतरतेमुळे, शरीरात थकवा देखील जाणवायला सुरुवात होते. अशा वेळी कामाच्या गडबडीतून थोडा वेळ ब्रेक घेऊन व्यायाम करा.
फळांचं सेवन करा
हिवाळा सुरु आहे. आणि या सीझनमध्ये बाजारात अनेक प्रकारची फळं उपलब्ध असतात. या फळांच्या सेवनाने शरीरातील इस्ट्रोजेन हार्मोनची पातळी देखील वाढवता येते. यासाठी अक्रोड, पिस्ता, खजूर आणि बदाम हे चांगले पर्याय आहेत. त्यांना उर्जेचे पॉवर हाउस देखील मानले जाते.
गवती चहा
आजकाल बाजारात अनेक प्रकारचे हर्बल टी उपलब्ध आहेत. त्यांच्या मदतीने शरीरात इस्ट्रोजेनचे उत्पादन देखील अगदी सहजपणे तुम्ही वजन वाढवू शकते. यासाठी तुम्हाला बाजारात अनेक पर्याय उपलब्ध असलेले मिळतील. गवती चहामध्ये अनेक पोषक तत्व आणि गुणधर्म असतात असे म्हणतात.
पुरेशी झोप घ्या
निरोगी शरीरासाठी किमात आठ तासांची झोप घेणं गरजचं आहे. यामुळे शरीरात हार्मोनल बदलांशी लढण्याची क्षमता निर्माण होते ज्यामुळे इस्ट्रोजेनची पातळी नियंत्रित ठेवता येते. त्यामुळे पुरेशी झोप घेणे खूप गरजेचे आहे. महिलांना जर निरोगी राहायचं असेल तर रोजच्या जीनातील या गोष्टींकडे विशेष लक्ष देणं गरजेचं आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :