Health Tips : असं म्हणतात दिवसाची सुरुवात आपण ज्या पद्धतीने करतो त्या पद्धतीनेच आपला संपूर्ण दिवस जातो. जसे की, जर तुम्ही सकाळी उठल्यानंतर चांगल्या सवयी फॉलो केल्या तर दिवसभर तुमचा मूड फ्रेश राहतो. थोडक्यात सांगायचं झालं तर, चांगलं आयुष्य जगण्यासाठी तुम्ही तुमच्या जीवनशैलीत (Lifestyle) काही बदल करणं गरजेचं आहे. जेणेकरून तुम्ही दिवसभर तणावमुक्त राहू शकाल. कोणत्याही गोष्टीची चिंता तुम्हाला जाणवणार नाही. 


अनेकदा असं होतं की, आपल्याला पुरेशी झोप मिळत नाही. अशा वेळी दिवसभर चिडचिड होते. याचा तुमच्या संपूर्ण दिवसावर परिणाम होतो. जर तुम्ही दररोज अशाच प्रकारच्या समस्येतून जात असाल तर तुम्हाला तुमची जीवनशैली बदलण्याची गरज आहे. जीवनशैलीतील बदलामुळे तुम्हाला दिवसभर उत्साही वाटेल. उत्साही वाटण्यासाठी, तुम्ही आतून तंदुरुस्त राहणे महत्त्वाचे आहे, यासाठी तुम्ही तुमच्या दिनचर्येत काही बदल करू शकता.


1.आरोग्यदायी आणि पौष्टिक नाश्त्याचं सेवन करा 


सकाळचा नाश्ता हा दिवसभरातील सर्वात महत्त्वाचा आहार मानला जातो. बरेच लोक उशिरा उठतात, त्यामुळे ते नाश्ता सोडून थेट दुपारचं जेवण करतात. त्यामुळे असं न करता सकाळची सुरुवात हेल्दी ब्रेकफास्टने करा. त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच मिळतील. दिवसभर एनर्जी लेव्हल राखण्यासाठी नाश्ता केल्याशिवाय घराबाहेर पडू नका.


2. सकाळी लवकर उठण्याची सवय लावा


जे लोक सकाळ उशिरा उठतात त्यांना महत्त्वाच्या गोष्टी करता येत नाहीत. जे लोक सकाळी ऑफिसला जातात ते रात्री उशिरा झोपतात, त्यामुळे त्यांना पुरेशी झोप मिळत नाही आणि दिवसभर थकवा जाणवतो. त्यामुळे निरोगी जीवन जगण्यासाठी तुम्ही तुमची झोपण्याची आणि उठण्याची वेळ निश्चित करणं गरजेचं आहे. 


3. ध्यान आणि व्यायाम करा


निरोगी जीवनशैलीसाठी, आपण आपल्या दैनंदिन दिनचर्यामध्ये व्यायाम करणं गरजेचं आहे. सकाळी फ्रेश झाल्यानंतर किमान 15-20 मिनिटंं व्यायाम करा. ध्यान आणि व्यायाम केल्याने तुमचे मन आणि शरीर दोन्ही सक्रिय राहते. यामुळे तुमच्या आयुष्यातील तणावही कमी होईल.


4. तंत्रज्ञानापासून दूर राहा


आजकाल लोकांचे जीवन मोबाईलशिवाय पूर्णच होत नाही. त्याचा थेट परिणाम आपल्या मेंदूवर होतो. सकाळी उठल्यानंतर किमान 1 तास कोणत्याही तंत्रज्ञानाचा वापर न करण्याचा प्रयत्न करा. यासाठी सकाळी उठल्याबरोबर मोबाईल वापरण्याची सवय तुमचा मेंदू मंद करू शकते.


5. ध्येय निश्चित करा


सकाळी उठल्यानंतर आणि फ्रेश झाल्यानंतर, आज तुम्हाला कोणते काम पूर्ण करायचे आहे याचा प्लॅन तयार करा. आणि स्वत:साठी ध्येय निश्चित करा. ध्येय निश्चित केल्याने, तुम्ही दिवसभर तुमचे ध्येय पूर्ण करण्यात गुंतून राहाल, ज्यामुळे तुमचा वेळ कमीत कमी वाया जाईल.


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : स्वयंपाकाच्या तेलाचा तुमच्या आरोग्यावर होतोय खोलवर परिणाम; आजच 'या' आरोग्यदायी पर्यायांनी बदला