Health Tips : थंडीच्या दिवसांत आपली रोगप्रतिकारकशक्ती (Immunity) तशीही कमी होते. अशा वेळी आपल्या आहाराची (Food) काळजी घेणं गरजेचं आहे. या ऋतूत आपल्या आहारात जास्तीत जास्त हिरव्या पालेभाज्या (Vegetables) तसेच भाज्यांचा समावेश करावा असं आरोग्य तज्ज्ञांचं मत आहे. तसेच, हिवाळ्यात तुमच्या आहारात हरभऱ्याचाही समावेश करणं गरजेचं आहे.


हिवाळ्यात काहींना हरभरे भाजून तर काहींना कोशिंबीर बनवून किंवा भाजी करून खायला आवडतात. हरभऱ्यामध्ये जीवनसत्त्वे, प्रोटीन, फायबर, कॅल्शियम, पोटॅशियम, मॅग्नेशियम आणि लोह यांसारखे अनेक पोषक घटक असतात. याशिवाय अनेक आजारांपासून बचाव करण्यातही हरभरे फार उपयुक्त ठरतात. याचसाठी हिवाळ्यात हरभरे खाण्याचे फायदे कोणते आहेत ते जाणून घेणार आहोत. 


वजन कमी करण्यास उपयुक्त 


जर तुम्हाला झटपट वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमच्या आहारात हरभऱ्याचा समावेश करू शकता. हरभऱ्यामध्ये फायबर मुबलक प्रमाणात आढळते. हे खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते. तसेच, वारंवार भूक लागत नाही.


प्रथिने


हरभऱ्यामध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात आढळतात. हे वनस्पती आधारित प्रथिने तयार करतात. त्यामुळे आपले स्नायू मजबूत होतात. याबरोबरच स्नायूंच्या विकासातही मदत होते. आपली त्वचा, केस आणि डोळे यासाठी प्रथिने खूप महत्त्वाची असतात.


हृदय निरोगी ठेवण्यासाठी उपयुक्त 


जर तुम्ही तुमच्या आहारात हिरव्या हरभऱ्यांचा समावेश केला तर तुमचे हृदय निरोगी राहण्यास मदत होईल. यामध्ये मॅग्नेशियम आणि पोटॅशियम असते, जे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत करते. याबरोबरच हिरवा हरभरा खराब कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत करतो.


अशक्तपणा दूर करण्यास उपयुक्त 


हरभऱ्यामध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे शरीरातील हिमोग्लोबिन पातळी वाढण्यास मदत होते. हरभऱ्याचं नियमित सेवन केल्याने शरीरातील रक्ताची कमतरता दूर होते. त्यामुळे ॲनिमियाची लक्षणे कमी होण्यास मदत होते. याशिवाय हरभऱ्यामध्ये व्हिटॅमिन-बी9 किंवा फोलेट मुबलक प्रमाणात आढळते, जे मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अशा प्रकारे हरभऱ्याचे एक ना अनेक फायदे आपल्याला पाहायला मिळतात. यासाठी तुम्ही सुद्धा हिवाळ्यात उपलब्ध होणाऱ्या या भाजीचा नक्की लाभ घेणं गरजेचं आहे. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : चेहऱ्यावर Instant ग्लो हवाय? ट्राय करा मलाई फेसपॅक; स्किन हायड्रेशनसाठीही उत्तम उपाय