Dry Skin Care Tips : हिवाळ्यामध्ये (Winter Season) त्वचेची विशेष काळजी घ्यावी लागते. कारण हिवाळ्यात त्वचा कोरडी होते. सामान्य त्वचा, कोरडी त्वचा आणि सेन्सिटिव्ह त्वचा हे त्वचेचे तीन प्रकार आहेत. थंडीमध्ये जर तुम्ही केमिकल्स असणाऱ्या प्रोडक्टचा वापर केला तर तुम्हाला रॅश येणे (Skin Rashes) आणि त्वचा कोरडी पडणे या समस्या जाणवतील. जर तुम्हाला मुलायमव त्वचा हवी असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय ट्राय करू शकता.
नारळाचे तेल जर तुमची त्वचा कोरडी होत असेल तर तुम्ही नारळाचे तेल त्वचेवर लावून मालिश करू शकता. नारळाच्या तेलामध्ये फॅटी अॅसिड असतात. त्यामुळे त्वचा मुलायम होते.
कोरफडचे जेल लावाकोरफड पासून तयार केलेल्या जेलमध्ये अँटी- इंफ्लेमेटरी आणि मॉयश्चराइजिंग प्रॉपर्टीज असतात. त्यामुळे जर तुम्ही कोरफड जेल चेहऱ्याला लावले तर तुमच्या चेहऱ्यावरील डाग देखील जाईल आणि त्वचा मुलायम देखील होईल.
बॉडी ऑइलचा वापर करा अंघोळीवरून आल्यानंतर त्वचेवर बॉडी ऑइलचा वापर करा. अंघोळ करण्यासाठी तुम्ही ज्या पाण्याचा वापर कराल, त्यामध्ये ऑलिव्ह ऑइल आणि कोकोनट ऑइलचे दोन थेंब टाका. या ऑइलचा वापर केल्याने त्वचेचा कोरडेपण जातो आणि त्वचा मुलायम होते.
कमी वेळात आंघोळ करा : हिवाळ्यात थंड हवामानामुळे त्वचा स्वतःच कोरडी होऊ लागते. त्यामुळे जास्त वेळ अंघोळ केली तर त्वचेचे तेल निघून जाते. अशा स्थितीत हिवाळ्यात अंघोळीची वेळ कमी ठेवावी. जेणेकरुन जास्त वेळ पाण्यात राहू नये.
टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.
इतर बातम्या :
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha