Health Tips : गेल्या काही वर्षांमध्ये बिंज वॉचिंगची क्रेझ मोठ्या प्रमाणात वाढली आहे. याचं सर्वात मोठं कारण म्हणजे OTT प्लॅटफॉर्मवर येणार्या वेब सिरीज किंवा चित्रपट. भारतीयांचा मोबाईल किंवा टीव्हीवरील स्क्रीन टाईम प्रचंड वाढला आहे. PubMed च्या अहवालानुसार, कोरोनानंतर, नेटफ्लिक्स (Netflix), अॅमेझॉन सारख्या OTT प्लॅटफॉर्मची क्रेझ जगभरात वाढली. लोकांना नेटफ्लिक्सचे इतके व्यसन लागले आहे की, ते रात्री उशिरापर्यंत टीव्ही पाहतात. काही लोक टीव्ही पाहता पाहता झोपतात.
पण, तुम्ही कधी विचार केला आहे का की टीव्ही पाहताना झोप लागण्याशी संबंधित धोके आहेत? एका नवीन अभ्यासानुसार ही सवय आपल्या आरोग्याला गंभीर नुकसान पोहोचवू शकते. संशोधनात असे म्हटले आहे की, या सवयीमुळे आपल्या झोपण्याच्या पद्धतीमध्ये व्यत्यय येतो ज्यामुळे वजन वाढण्याची शक्यता वाढते.
संशोधनात काय म्हटलंय?
खरंतर, शिकागो येथील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटी स्कूल ऑफ मेडिसिनमध्ये 2022 साली एक संशोधन करण्यात आलं. यामध्ये साधारण 550 लोकांचा समावेश होता, ज्यांचे वय 63 ते 84 वर्षे होते. या लोकांचा दिनक्रम पाहून त्यांच्यावर निरीक्षणही केले जात होते. अभ्यासानुसार, अशा प्रकारच्या सवयीमुळे शरीरात लठ्ठपणा, मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो.
संशोधनानुसार, जे लोक टीव्हीवरून कमी प्रकाशात झोपत होते त्यांच्यामध्ये इन्सुलिनची पातळी बिघडली होती. त्यामुळे शरीरातील रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते. खरंतर, झोपण्याच्या या पद्धतीमुळे मधुमेह आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. बीपी, साखर आणि लठ्ठपणामुळे हृदयविकाराचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.
स्लीपिंग डिसऑर्डरचे तोटे
तज्ज्ञांचं म्हणणं आहे की, जर तुम्ही सतत कमी झोप घेत असाल किंवा स्क्रीनवर जास्त वेळ घालवला तर त्याचा आपल्या मेंदूवर वाईट परिणाम होतो. मानसिक आरोग्यामुळे शारीरिक स्वास्थ्यही बिघडू लागते.
तरुणाईवर वाईट परिणाम होतो
हे संशोधन तरुणांना अधिक चिंतेत टाकत आहे. कारण बहुतेक तरूण हे टीव्ही पाहता पाहता झोपतात. तसेच, यामुळे तुमच्या झोपेच्या पोश्चरवर देखील परिणाम होतो आणि स्नायूशी संबंधित समस्या उद्भवतात.
तुमची झोपेची पद्धत 'अशा' प्रकारे बदला
तुम्हाला जर पुरेशी झोप घ्यायची असेल तर त्यासाठी ध्यान करा. जेव्हा गरज वाटेल तेव्हाच टीव्ही किंवा फोनचा वापर करा. याशिवाय तुम्हाला ज्या गोष्टींमध्ये रस आहे ते करा. तसेच, पुस्तके वाचण्याची सवय लावा. यामुळे मानसिक आरोग्य सुधारते. सकस आहार आणि अधिकाधिक पाणी प्या.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Pregnancy Tips : गरोदरपणात हाय हिल्स घालाव्यात की घालू नये? जाणून घ्या काय म्हणतात तज्ज्ञ?