Tomato Side Effects : टोमॅटोचं सेवन बहुतेक प्रत्येक घरात केला जातो. विशेषत: भाजीत टोमॅटोचा जास्त वापर केला जातो. बरेच लोक सॅलड बनवतात आणि जेवणासोबत खातात. टोमॅटोमध्ये कॅलरी कमी आणि पौष्टिकता भरपूर असते. यामध्ये व्हिटॅमिन सी, फॉस्फरस, कॅल्शियम आणि पोटॅशियम सारखे आवश्यक पोषक घटक आढळतात, जे अनेक गंभीर आजारांपासून संरक्षण करण्याचे काम करतात. या दृष्टीने टोमॅटोचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत.

मात्र, कोणत्याही गोष्टीचे फायदे तसेच तोटेही आहेत. त्याचप्रमाणे टोमॅटोचे जास्त सेवन करणे देखील हानिकारक ठरू शकते. जास्त टोमॅटो खाल्ल्याचा एक सामान्य दुष्परिणाम म्हणजे लाइकोपीनचा ओव्हरडोज. या ठिकाणी आम्ही तुम्हाला टोमॅटोच्या अतिसेवनाच्या 5 वाईट परिणामांबद्दल सांगणार आहोत.

अॅसिडिटीची समस्या

टोमॅटो आम्लयुक्त असतात, जे तुमच्या पोटात अधिक गॅस्ट्रिक अॅसिड तयार करण्याचे काम करतात. जास्त टोमॅटो खाल्ल्याने छातीत जळजळ होऊ शकते. 

सांधे दुखी

टोमॅटोचे जास्त सेवन केल्याने सांधेदुखी समस्या उद्भवू शकते. कारण टोमॅटोमध्ये सोलॅनिन नावाचा अल्कलॉइड असतो. यामुळे सांध्यांना सूज आणि वेदना होऊ शकतात. टोमॅटो ऊतींमध्ये कॅल्शियम तयार करतात, ज्यामुळे पुढे जळजळ होऊ शकते.

ऍलर्जी होते

टोमॅटोमध्ये आढळणारा हिस्टामाइन हा घटक त्वचेवर पुरळ किंवा ऍलर्जीची समस्या निर्माण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल तर त्याचे कमी प्रमाणात सेवन करा किंवा आधी डॉक्टरांचा सल्ला घ्या. कारण जास्त प्रमाणात टोमॅटोचे सेवन केल्याने तोंड, चेहरा आणि जिभेला सूज येणे, घशातील संसर्ग यांसारख्या ऍलर्जीच्या प्रतिक्रिया जाणवू शकतात. जर तुम्हाला टोमॅटोची ऍलर्जी असेल, तर त्याला स्पर्श केल्यास देखील तुमच्या त्वचेवर सूज आणि जळजळ होऊ शकते.

मूत्रपिंडाची समस्या

किडनीचे आजार असलेल्यांनी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय टोमॅटोचे सेवन करू नये. कारण त्यामध्ये पोटॅशियमचे प्रमाण जास्त असते. टोमॅटो, टोमॅटो सॉस, टोमॅटो सूप आणि इतर टोमॅटो-आधारित पदार्थांचे सेवन टाळल्याने रक्तातील पोटॅशियमची उच्च पातळी कमी होण्यास मदत होते, ज्यामुळे गंभीर मूत्रपिंड समस्या उद्भवू शकतात.

टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.

महत्त्वाच्या बातम्या :

Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल