Health Tips : जर तुम्हाला निरोगी राहायचे असेल तर हृदय (Heart) निरोगी ठेवणे खूप महत्वाचे आहे. जर तुम्हाला तुमचे शरीर तसेच तुमचे हृदय निरोगी ठेवायचे असेल तर सकाळी उठून विशिष्ट आहाराचे पालन करणं गरजेचं आहे. यासाठी सकाळी रिकाम्या पोटी काही ज्यूस पिण्याची सवय लावा. या खास पेयामुळे कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रणात राहते. तुमचे हृदय किती निरोगी आहे हे तुमच्या आहार आणि जीवनशैलीशी (Lifestyle) संबंधित आहे. तुमचे हृदय निरोगी ठेवण्यासाठी, रक्तवाहिन्या आणि शिरा निरोगी राहणे खूप महत्वाचे आहे. 


हृदयाच्या चांगल्या आरोग्यासाठी 'ही' पेये रिकाम्या पोटी प्या


गरम लिंबू पाणी


तुमच्या दिवसाची सुरुवात एक ग्लास कोमट लिंबू पाण्याने करा. लिंबू व्हिटॅमिन सी आणि अँटीऑक्सिडंट्सने समृद्ध आहे. जे जळजळ कमी करण्यास आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करू शकते. हे पचन आणि डिटॉक्सिफिकेशनमध्ये देखील मदत करते. निरोगी हृदयासाठी लिंबू पाणी खूप गरजेचे आहे.


ग्रीन टी 


ग्रीन टीमध्ये कॅटेचिन नावाचे अँटीऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असते. ज्याचा संबंध हृदयाचे आरोग्य सुधारण्यासाठी केला जातो. रिकाम्या पोटी एक कप ग्रीन टी प्यायल्याने कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होण्यास आणि रक्ताभिसरणाचे कार्य सुधारण्यास मदत होते.


बीटचा रस


बीटचा रस अनेक प्रकारच्या पोषक तत्वांशी संबंधित आहे. बीट हे पोषक तत्वांचे पॉवरहाऊस आहे. त्यात भरपूर नायट्रेट असते. ज्यामुळे रक्ताभिसरण चांगले राहते. त्याचबरोबर बीपी नियंत्रणात ठेवते. रिकाम्या पोटी बीटचा रस पिणे हृदयासाठी खूप फायदेशीर आहे.


हळदीचे दूध 


हळदीमध्ये कर्क्यूमिन असते, जे एक शक्तिशाली दाहक-विरोधी संयुग आहे. गरम दुधात एक चमचे हळद घातल्याने खूप फायदेशीर ठरते. याचे नियमितपणे सेवन केल्यास, ते जळजळ कमी करण्यास आणि हृदयाच्या आरोग्य सुधारण्यास मदत करते.


तुम्हाला जर अनेक आजारांपासून दूर राहायचे असेल तसेच निरोगी जीवनशैली हवी असेल तर तुम्ही तुमच्या आहारात तसेच लाईफस्टाईलमध्ये बदल करणं गरजेचं आहे. तुम्ही वर दिलेल्या पेयांचा समावेश तुमच्या लाईफस्टाईलमध्ये करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : मनःशांतीसाठी 'या' 4 गोष्टींपासून दूर राहा; स्वतःवर प्रेम असेल तर 'या' गोष्टी कोणत्याही किंमतीत करू नका