Health Tips : थंडीच्या दिवसांत गरमागरम सूप पिण्याचा आनंद हा वेगळाच आहे. यामुळे शरीर उबदार राहते तसेच शरीराला अनेक पौष्टिक घटक देखील मिळतात. सूप (Soup) आपल्या शरीरासाठी अनेक प्रकारे फायदेशीर आहे. बरेच लोक वजन कमी (Weight Loss) करण्यासाठी सूप पितात, पण, अनेक वेळा सूप पिऊन शरीरात कोणत्याच प्रकारचा बदल घडत नाही. याचं कारण म्हणजे सूप बनवताना काही छोट्या चुका होतात. ज्यामुळे सूपचा तुमच्या शरीरावर फारसा परिणाम होत नाही. सूप पिताना या महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत. या चुका नेमक्या कोणत्या ते पाहूयात. 


सूपचे साहित्य


सूप बनवत असताना त्यामध्ये वापरल्या जाणाऱ्या भाज्यांचं, मसाल्यांचं योग्य प्रमाण निश्चित करा. यामधून तुम्हाला सूपमध्ये किती प्रमाणात प्रथिने, फायबर, कार्ब्स आणि फॅट मिळतं हे जाणून घ्या. 


पॅकेट सूप पिणे


जर तुम्ही वजन कमी करण्यासाठी पॅकेट सूप पीत असाल. तर, त्यामुळे तुम्हाला यातून कोणताही बदल दिसणार नाही. पॅकेटमध्ये असलेल्या सूपमध्ये अनेक प्रकारचे केमिकल्स, सोडियम आणि प्रीजर्वेटिव्ह्स असतात, ज्यामुळे ते शरीराला नुकसान पोहोचवू शकते. त्यामुळे सूप नेहमी घरीच बनवा.


सूपमध्ये खूप जास्त पाणी असणे 


सूपमध्ये पाण्याचं प्रमाण योग्य असणं गरजेचं आहे. कारण आवश्यकतेपेक्षा जास्त पाणी टाकल्याने सूप पातळ होतो आणि कमी पाण्याने सूप खूप घट्ट होते. त्यामुळे सूप बनवताना योग्य प्रमाणात पाणी घाला.


सूपमध्ये मसाल्याचा अतिवापर 


सूपची चव वाढविण्यासाठी, अनेक मसाल्यांचा वापर करणं गरजेचं आहे. त्यात मीठ, काळी मिरी आणि अनेक प्रकारचे मसाले टाकले जातात. पण, आवश्यकतेपेक्षा जास्त प्रमाणात मसाला वापरू नये. यामुळे तुम्हाला छातीत जळजळ होण्याची शक्यता असते. 


फक्त सूप पिणे 


काही लोक झटपट वजन कमी करण्यासाठी जेवण न करता फक्त सूप पितात. आणि दिवसभर फक्त सूपवरच अवलंबून राहतात. यामुळे तुमच्या शरीराला पूर्ण पोषण आणि ऊर्जा मिळत नाही.


साहित्यांना व्यवस्थित एकजीव होऊ द्या 


सूप बनवताना नेहमी लक्षात ठेवा की, त्यातील सर्व साहित्य हे व्यवस्थित एकजीव झाले पाहिजेत. कारण बऱ्याचदा सूप लवकर बनवण्यासाठी लोक त्यातील घटक नीट विरघळू देत नाहीत, त्यामुळे सूपची हवी तशी टेस्ट येत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Health Tips : सेलिब्रेशननंतर थोडा हलका आणि निरोगी नाश्ता हवाय? 'ही' रेसिपी वापरून पाहा