Health Tips : भारतात चहाची (Tea) आवड अनेकांना आहे. असे बरेच लोक आहेत ज्यांचा दिवस चहाशिवाय सुरुच होत नाही. काही लोक तर दिवसभरात 3-4 वेळा किंवा त्याहून अधिक वेळा चहा पितात. तर असे अनेक संशोधनातून हे सिद्ध झालं आहे की, जास्त चहा प्यायल्याने हाडे कमकुवत होतात. तसेच, अनेक प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवू शकतात. मात्र, असे काही लोक आहेत जे बऱ्याचदा खूप चहा बनवतात आणि जेव्हा त्यांना वाटतं तेव्हा ते गरम करतात आणि पुन्हा पुन्हा तो चहा पितात. पण हे तुमच्यासाठी किती धोकादायक आहे याचविषयी या ठिकाणी आपण अधिक माहिती जाणून घेणार आहोत. 


थंड चहा आरोग्यासाठी घातक?


'टाइम्स ऑफ इंडिया'मध्ये प्रसिद्ध झालेल्या बातमीनुसार, जर तुम्ही ताबडतोब म्हणजेच 15 किंवा 20 मिनिटांपूर्वी चहा बनवला असेल तर तुम्ही तो पुन्हा गरम करू शकता. यातून कोणतेही नुकसान होत नाही. मात्र, तज्ञ म्हणतात की, नेहमी ताजा चहा पिण्याचा प्रयत्न करा. तुम्ही तो चहा पुन्हा गरम केला नाही तर चांगले होईल. जर तुमचा झटपट चहा थंड झाला असेल तर तुम्ही तो गरम करून पिऊ शकता, पण त्याची सवय लावू नका. खरंतर, चहा पुन्हा गरम केल्यावर त्यातील चव, सुगंध आणि घटक नष्ट होतात. आरोग्य तज्ज्ञांच्या मते, चहा तयार करून 4 तास झाले असतील तर चुकूनही तो पुन्हा गरम करून पिऊ नका. कारण यामुळे शरीराला मोठं नुकसान होऊ शकते. यामध्ये बॅक्टेरिया पसरू लागतात. काही तासांतच बॅक्टेरिया पसरू लागतात. दुधासह चहामध्ये बॅक्टेरिया वेगाने पसरतात. दुधाचा चहा चुकूनही पुन्हा गरम करून पिऊ नका. 


दूध आणि साखरेच्या चहाची समस्या


बहुतेक लोक दुधाचा चहा पिणे पसंत करतात. साखरेमुळे दुधाच्या चहामध्ये बॅक्टेरिया मोठ्या प्रमाणात वाढतात. दूध आणि साखर घालून चहा बनवला की लगेच तो थंड होतो आणि खराब होतो. गरम करून थंड चहा प्यायल्यास शरीराला मोठं नुकसान होते हे खरे आहे. म्हणून थंड चहा पुन्हा गरम करू नका. यामुळे पोटात अनेक दुष्परिणाम होतात. जसे मळमळ, बद्धकोष्ठता, गॅसच्या समस्या उद्भवतात.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Skin Care Tips : चेहऱ्यावरच्या ऑईली स्किनने हैराण आहात? मुलतानी मातीचा स्पेशल फेस पॅक आहे रामबाण उपाय; जाणून घ्या कसा बनवायचा