Health Tips : आजकालच्या व्यस्त जीवनशैलीमुळे (Lifestyle) अनेकांना आपल्या आरोग्याकडे लक्ष देणं फारसं जमत नाही. यामुळे रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. ज्याप्रमाणे उच्च रक्तदाबामुळे आपल्याला त्रास होतो. तसेच कमी रक्तदाबामुळेही आपल्याला त्रास होऊ शकतो. कमी रक्तदाब (BP) देखील आरोग्यासाठी धोकादायक आहे. साधारणपणे निरोगी व्यक्तीचा सामान्य रक्तदाब 120/80 mm Hg असणं गरजेचं आहे. मात्र, जेव्हा एखाद्या व्यक्तीचा रक्तदाब 90/60 mm Hg च्या खाली जातो तेव्हा त्याला कमी रक्तदाब किंवा हायपोटेन्शन असेही म्हणतात. आपलं आरोग्य चांगलं राहण्यासाठी रक्तदाब सामान्य असणे खूप आवश्यक आहे. पण, काही कारणांमुळे तो कधी कमी होतो तर कधी जास्त असतो. बीपी कमी होण्याचे सर्वात मोठं कारण म्हणजे शरीरात पाण्याची कमतरता असणे. त्यामुळे शरीरात पाण्याची कमतरता भासू देऊ नका आणि जर कधी कमी झाले तर या आयुर्वेदिक उपायांचा अवलंब करा.
कमी रक्तदाबाची लक्षणे
रक्तदाब कमी झाला की शरीरात अनेक प्रकारची लक्षणे दिसू शकतात.
- थकवा
- अशक्तपणा
- अस्वस्थता
- धूसर दृष्टी
- गोंधळ
- लक्ष केंद्रित करण्यात अडचण
- मळमळ
- चक्कर येणे
- श्वसनविषयी दाह, फुफ्फुसातील दाह
- धडधडणे
तुमचा बीपी कमी असेल तर 'हे' उपाय करून पाहा
हिमालयीन मीठाचं सेवन कसं करावं?
1/2 चमचे हिमालयीन मीठ एका ग्लास सामान्य पाण्यात मिसळून प्यायल्याने कमी रक्तदाबापासून त्वरित आराम मिळतो. आयुर्वेदानुसार हिमालयीन मीठ आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. हिमालयीन मीठ वात, पित्त आणि कफ या तीनही प्रकारचे दोष दूर करण्यास सक्षम आहे.
रक्तदाब कसा नियंत्रित करायचा?
खरंतर, हिमालयीन सैंधव मीठ पोटॅशियमचा उत्कृष्ट स्रोत आहे. यामुळे रक्तदाब नियंत्रित ठेवण्यास मदत होते, त्यामुळे तुमचा किंवा तुमच्या कुटुंबातील कोणाचा रक्तदाब अचानक कमी झाला असेल तर लगेच हे मीठ पाण्यासोबत घ्या. रक्तदाब सामान्य होण्यास सुरुवात होईल.
हे मीठ तुम्हाला हायड्रेट देखील ठेवते
हिमालयीन मीठ शरीराला हायड्रेट ठेवते. याबरोबरच हिमालयीन मीठ शरीरातील विषारी पदार्थ काढून टाकण्यासाठीही खूप प्रभावी आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :