Foods For Happy Mood : सध्याच्या धकाधकीच्या जीवनात कामाच्या वाढत्या ताणामुळे तणाव, चिंता (Anxiety), नैराश्य यांचं प्रमाण फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललं आहे. याच कारणामुळे अनेकांना मानसिक समस्यांना सामोरं जावं लागतंय. यासाठी जितकी आपण आपल्या शरीराची काळजी घेतो तितकीच आपण आपल्या मानसिक स्वास्थ्याचीही (Mental Health) काळजी घेणं गरजेचं आहे. तुमचा मानसिक ताण कमी करण्यासाठी व्यायाम, योगा आणि डॉक्टरांचा सल्ला तर महत्त्वाचा आहेच. पण, त्याचबरोबर काही फळं, पालेभाज्यांच्या माध्यमातून देखील तुम्ही तुमचा मानसिक ताण दूर करू शकता. 


काही पदार्थांचं सेवन केल्याने शरीरात हॅपी हार्मोन्स तयार होतात. यामुळे तुमचा मेंदू सक्रिय राहतो. यासाठी या पदार्थांत समाविष्ट असलेले व्हिटॅमिन्स, मिनरल्स हे या प्रकियेत मेंदू निरोगी ठेवण्यास मदत करतात. शरीरात हॅपी हार्मोन्स निर्माण करणारे हे 5 पदार्थ नेमके कोणते ते जाणून घेऊयात. 


मशरूम




रिपोर्ट्सनुसार, मशरूममधून व्हिटॅमिन डी फार मोठ्या प्रमाणात मिळतं. व्हिटॅमिन तुमचा मूड आणि मेंटल हेल्थ चांगली ठेवण्यासाठी फार उपयुक्त आहे. या फळभाजीमुळे सेरोटोनिन हार्मोन्सची पातळी वेगाने वाढते. आणि आपली मानसिक तसेच भावनिक स्थिती चांगली राहते. 


चेरी टोमॅटो 




या चेरी टोमॅटोमध्ये लायकोपीन भरपूर प्रमाणात असते. यामुळे तुमचा मूड चांगला राहण्यास मदत होते. तसेच या टोमॅटोचा परिणाम एन्टीऑक्सिडेंटसारखा असतो ज्यामुळे डिप्रेशनसारखी लक्षणं फार कमी दिसतात. तुम्ही या टोमॅटोचा वापर भाजीत, डाळीत, किंवा सॅलाड बनविण्यासाठी देखील करू शकता. 


पालक 




पालक ही छान हिरवीगार अशी पालेभाजी आहे. पालकात अनेक पोषक तत्त्वांचा समावेश आहे. 
पालकाचं सेवन केल्याने फायबर, व्हिटॅमिन ई आणि हॅपी हार्मोन्स निर्माण होतात. थंडीच्या दिवसांत पालकाचं सेवन केल्याने फायदेशीर ठरतं. तसेच, तुम्ही सॅलाडच्या रूपातही याचं सेवन करू शकता. 


केळी


 


केळी फक्त हृदयासाठीच फायदेशीर आहेत असं नाही तर तुमच्या मेंदूला रिलॅक्स करण्यासाठी देखील केळी फार उपयुक्त ठरतात. केळ्यामध्ये व्हिटॅमिन  बी 6 असतं जे सेरोटोनिन आणि डोपामाईन बनविण्यासाठी फार उपयोगी ठरतं. केळ्याचं सेवन केल्याने तुमचा मूडही फ्रेश राहतो. 


डाळी 



खरंतर, अनेक प्रकारच्या डाळींना व्हेजिटेरियन प्रोटीनसाठी ओळखलं जातं. डाळींमध्ये फोलेटचं प्रमाण फार जास्त असतं. हे व्हिटॅमिन डोपामाईन आणि सेरोटोनिन सिंथेसिस बनवण्यासाठी फरा आवश्यक आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या :


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


Pregnancy Health Issues : गरोदरपणात महिलांना 'या' आजारांचा सर्वाधिक धोका; अशी आरोग्याची काळजी घ्या