Health: जगभरात वाढत्या मधुमेहाचं प्रमाण चिंतेचा विषय असून प्रत्येक 4 पैकी 3 प्रौढांना मधुमेह असल्याचे आंतरराष्ट्रीय डायबेटीस फेडरेशनचा अहवाल सांगतो. आजकाल लहान मुलांपासून वृद्धांपर्यंत हा आजार होताना दिसत असून शुगर नियंत्रित करण्यासाठी ब्लड शुगर ताब्यात ठेवणं आवश्यक असल्याचं तज्ञ सांगतात. 


नियमित व्यायाम, आहारात संतूलन आणि डॉक्टरांनी दिलेल्या गोळ्या वेळेत घेणं गरजेचं असून यानं रक्तातीली शुगर कंट्रोलमध्ये राहते. पण रक्तातील साखर वाढली की अनेक समस्यांना सामोरं जावं लागतं. अनेकदा आपण बीपी शुट झाल्याचं ऐकतो. पण रक्तातली शुगरची पातळी शुट झाली तर ते चिंतेचं कारण असू शकतं. यासाठी किती शुगर असणं हे सामान्य आहे, शुगर कोणत्या पातळीनंतर वाढली आहे असं म्हणतात? शुगर शुट कधी होते? हे माहित असणं गरजेचं आहे.


शुगरची सामान्य पातळी किती?


डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, शुगरची कमी पातळी 180 mg/dl आणि कमाल 250 mg/dl एवढी असणं आवश्यक आहे. 250mg/dl त्याहून अधिक   शुगर असेल तर ती वाढलेली समजली जाते. 300mg/dh हून अधिक शुगरची पातळी वाढली तर शुगर शुट झाली असे म्हटले जाते. 300mg/dl या पातळीच्या पुढे शुगर गेली तर ती अत्यंत धोकादायक समजली जाते. तर काहींची शुगर 600mg/dl पेक्षाही अधिक झाल्याचं नोंदवलं जातं. 600 mg/dL जास्त ब्लड शुगर लेवल रूग्णांच्या आरोग्यासाठी घातक मानली जाते. या स्थितीला हायपरग्लाइसेमिक हायपरोस्मोलर नॉनकेटोटिक सिंड्रोम (HHNS) असं म्हटलं जातं.


शुगर वाढली की शरिरात काय लक्षणं दिसतात?


सारखी तहान लागणं, अंगाला खाज येणं, नजर कमजोर होणं, सारखी डोकेदुखी तसेच वारंवार थकवा, तोंड कोरडं पडणे, सतत लघवी होणं अशी लक्षणं दिसत असतील तर वेळीच डायबेटीस टेस्ट करून घेणं आवश्यक आहे. 


जगभरातल्या शुगर पेशंटपेक्षा भारतात सर्वाधिक


पॅसिफीक समुद्राच्या दक्षिणेकडील राष्ट्रामध्ये मधुमेहाचा आलेख चढा असून तो आकडा जागतिक आकडेवारीच्या तुलनेत मध्यम स्तरावर आहे. दक्षिण मध्ये आशियात आणि भारतात मधुमह होण्याचे प्रमाण सर्वाधिक असून 68 टक्के आहे. 2045 पर्यंत हे प्रमाण 152 मिलियन होण्याची भीती आंतरराष्ट्रीय डायबेटीस फेडरेशनने वर्तवली आहे.


यामुळे वाढतो मधुमेहाचा धोका


मधुमेहाचा कौटुंबिक इतिहास
जास्त वजन
अस्वस्थ आहार
शारीरिक निष्क्रियता
वाढते वय
उच्च रक्तदाब
वांशिकता
अशक्त ग्लुकोज सहिष्णुता (IGT)*
गर्भधारणा मधुमेहाचा इतिहास
गर्भधारणेदरम्यान खराब पोषण


वाढता लठ्ठपणा ठरु शकतो धोकादायक


सुमारे ९० टक्के लोकांना टाईप २ चा मधुमेहाचं प्रमाण वाढते आहे. लठ्ठपणा हे त्यामागचे कारण सांगितलं जात आहे. यासाठी बैठी जीवनशैली, चुकीचा आहार  आणि लठ्ठपणामुळे मधुमेहाचे प्रमाण वाढले आहे. सामान्य रक्तातील ग्लुकोज पातळीपेक्षा जास्त असलेल्या परंतु मधुमेह समजण्यासाठी पुरेसा नसलेल्या व्यक्तींमध्ये योगासने टाइप 2 मधुमेहाची प्रगती रोखू शकते का यावर अभ्यास केला गेला. देशात अंदाजे 101 दशलक्ष लोक मधुमेहासह जगत आहेत, आणखी 136 दशलक्ष लोक प्री-डायबिटीससह जगत आहेत, त्यापैकी बहुतेकांना जीवनशैलीत लक्षणीय बदल न करता मधुमेह होण्याची शक्यता आहे.