Health News : असं म्हणतात ना.. तुमचं हृदय (Heart) चांगल तर सर्वकाही चांगलं. निरोगी आयुष्यासाठी शरीरासोबतच हृदयही निरोगी असायला हवं. पूर्वी हृदयविकार फक्त वृद्ध व्यक्तींनाच होत असे, मात्र गेल्या काही दशकांमध्ये 40 वर्षांवरील व्यक्तीही हृदयविकाराचा झटका, पक्षाघात आणि हृदयविकाराच्या झटक्याला बळी पडत आहेत, जी अत्यंत चिंतेची बाब आहे. असंतुलित जीवनशैली, असंतुलित आहार आणि वाढता ताणतणाव या कारणांमुळे हार्ट ब्लॉकेजचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढत आहेत.


 


हार्ट ब्लॉकेज का आणि केव्हा होते?


जेव्हा हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या नसांमध्ये कोलेस्टेरॉल आणि प्लेक जमा होऊ लागतात, तेव्हा नसांमध्ये अडथळा निर्माण होतो. याशिवाय रक्त घट्ट होऊन रक्ताच्या गुठळ्याही अरुंद होतात. नसा अरुंद झाल्यामुळे रक्ताभिसरण नीट होत नाही आणि हृदयविकाराचा झटका येण्याचा धोका वाढतो. त्यामुळे हार्ट ब्लॉकेज टाळण्यासाठी शक्य ते सर्व उपाय योजावेत, असा सल्ला आरोग्य तज्ज्ञ देतात. जाणून घेऊया कोणत्या प्रकारचे ज्यूस तुमच्या शरीरातील शिरा स्वच्छ करण्यास मदत करू शकतात. हा रस अतिशय गुणकारी असून अगदी कमी खर्चात तयार करता येतो.


 


हा रस अत्यंत गुणकारी! हार्ट ब्लॉकेजला बसेल आळा..


आजकालची असंतुलित जीवनशैली, वेळेवर न खाणे, अपूर्ण झोप यामुळे तुमच्या हृदयासाठी ही धोक्याची घंटा असल्याचं सांगितलं जातं. यासाठी लिंबू, लसूण आणि आल्याचा रस तुमच्या हृदयाच्या ब्लॉक झालेल्या नसा उघडू शकतो. लिंबूमध्ये आढळणारे अँटी-ऑक्सिडंट्स शिरा स्वच्छ करतात आणि ब्लॉकेजची शक्यता कमी करतात. लिंबाच्या आत आढळणारे फ्लेव्होनॉइड रक्तवाहिन्या स्वच्छ करण्यास मदत करतात. आल्याबद्दल बोलायचे झाले तर ते कोलेस्ट्रॉल कमी करते आणि त्यात आढळणारे अँटी-ऑक्सिडंट नसांच्या आरोग्यासाठी चांगले असतात. लसूण हा एक अद्भुत मसाला आहे जो प्रत्येक घरात आढळतो. या रसात लसूण घातल्यास हृदयातील अडथळे लवकर संपतील कारण लसूण रक्तातील गुठळ्या तयार होण्याच्या प्रक्रियेला प्रतिबंधित करतो. जर तुम्ही हा लसणाचा रस रोज प्यायला तर तुमचे घट्ट रक्त लवकरच पातळ होऊ लागेल आणि तुमच्या हृदयाला होणारा धोकाही कमी होईल.


 


 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Mental Health : आयुष्य निरर्थक वाटू लागलंय? उदासीनपणा वाटतोय? 'या' टिप्स फॉलो करा, All Is Well!