Health News : आपण जेव्हा बाजारातून फळे, भाज्या आणतो. आणि त्या फ्रिजमध्ये ठेवतो. पण अनेक वेळा फळे आणि भाज्या फ्रिजमध्ये ठेवल्यानंतरही खराब होतात. समजा, कधीतरी लांब सुट्टीवर जायचं असल्यास या भाज्या फ्रिजमध्ये राहतील का? याची चिंता अनेक गृहिणींना सतावते. हे टाळण्यासाठी काही अत्यंत उपयुक्त टिप्स आम्ही तुम्हाला सांगत आहोत. त्याचबरोबर कोणत्या गोष्टी फ्रीजमध्ये ठेवणे टाळावे लागेल? जाणून घ्या...



 
भन्नाट टिप्स जाणून घ्या 


तसं फळे, भाज्या आणि इतर पदार्थ फ्रिजमध्ये बराच काळ ताजे राहतात. पण कधी कधी आपल्या निष्काळजीपणामुळे काही भाज्या खराब होऊ लागतात आणि जेवणातील ताजेपणाही जातो. हे सर्व टाळण्यासाठी आम्ही तुमच्यासोबत 10 टिप्स शेअर करत आहोत, ज्यामुळे तुम्ही फळे, भाज्या आणि अन्न बराच वेळ ताजे ठेवू शकाल आणि त्यांची नैसर्गिक चवही अबाधित राहील.



ओली फळे, भाज्या 


बरेच लोक बाजारातून फळे आणि भाज्या आणतात आणि थेट रेफ्रिजरेटरमध्ये ठेवतात. परंतु जर ते ओले असतील तर आपण त्यांना रेफ्रिजरेटरमध्ये ठेवणे टाळावे. प्रथम ते पूर्णपणे स्वच्छ करा आणि नंतर ते कोरडे झाल्यावर रेफ्रिजरेटरमध्ये ठेवा. ओले फळे आणि भाज्या लवकर खराब होतात.


 


रेफ्रिजरेटर जास्त काळ उघडे ठेवणे


फळे आणि भाजीपाला साठवून ठेवल्यानंतर फ्रीजचा दरवाजा व्यवस्थित बंद करा आणि फ्रीज पुन्हा पुन्हा उघडणे टाळा. रेफ्रिजरेटरचा दरवाजा आवश्यक तेवढाच वेळ उघडा. जास्त वेळ दरवाजा उघडा ठेवल्याने त्याच्या तापमानात बदल होतो आणि आत ठेवलेला माल खराब होऊ शकतो.



सुट्टीवर जाण्यापूर्वी या गोष्टी करा


काही दिवसांसाठी घराबाहेर जावे लागत असेल तर नाशवंत वस्तू फ्रीजमधून काढून टाका. जर तुमच्या फ्रीजमध्ये ही सुविधा असेल तर तुम्ही हॉलिडे मोड चालू करू शकता जेणेकरून तुम्ही नसताना फ्रीज खूप कमी वीज वापरतो.


 


स्वच्छता आणि सर्व्हिस


फ्रीजची नियमित साफसफाई करणे देखील खूप महत्वाचे आहे. जर काही खाद्यपदार्थ पडले असतील तर ते ताबडतोब स्वच्छ करा जेणेकरून तेथे बॅक्टेरिया वाढू नयेत. फ्रीज नियमित साफ न केल्यास त्यातून दुर्गंधी येऊ लागते आणि त्यात ठेवलेल्या अन्नाच्या गुणवत्तेवरही परिणाम होतो. जर तुम्हाला वाटत असेल की फ्रीजचे कूलिंग नीट काम करत नसेल तर सर्व्हिस प्रोव्हायडरशी संपर्क साधा आणि फ्रीज सर्व्हिस करून घ्या.


 


लक्षात ठेवा, 'या' गोष्टी फ्रिजमध्ये ठेवणे टाळा..


कांद्यासारख्या काही गोष्टी फ्रिजमध्ये न ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कांदा फ्रीझमध्ये ठेवल्यास त्याची चव खराब होते. फ्रीजमध्ये तेल, सौंदर्यप्रसाधने, मध, संत्री आणि केळी यांसारख्या वस्तू ठेवणे टाळा.


 


टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )


हेही वाचा>>>


Health News : निरोगी राहायचा मंत्र तुमच्याच किचनमध्ये! आरोग्यासाठी 'हे' मसाले खूप उपयुक्त, जेवणही बनते चविष्ट