Health News : बटाटा वडा, बटाटा पुरी, पोटॅटो चिप्स असे पदार्थ आठवले की तोंडाला पाणी सुटतं ना!. बटाटा ही एक भाजी आहे जी आपल्या अनेक पदार्थांचा अविभाज्य भाग आहे. पण, आरोग्याची काळजी घेणारे लोक बटाटे थोडेसे खाणे टाळतात. लोकांचा असा विश्वास आहे की, बटाट्यामुळे तुमचे वजन वाढते आणि शरीरातील साखरेचे प्रमाण वाढते. त्यामुळे शरीर मधुमेह, हृदयविकार अशा अनेक आजारांना बळी पडू शकते. पण आता एका संशोधनानुसार, बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं की नाही यावर अभ्यास करण्यात आला आहे, ज्यामधून एक आश्चर्यकारक सत्य समोर आलंय.
बटाटे खाल्ल्याने वजन वाढतं की नाही?
लठ्ठपणा असलेल्यांना बटाटे खाण्याची सर्वाधिक चिंता असते. कारण बहुतेक लोकांच्या मनात एकच गोष्ट असते की बटाटे खाल्ल्याने तुमचे वजन वाढते आणि त्यामुळे पोटाची चरबी वाढते. पण तुम्हाला हे माहिती आहे का? की बटाट्यामध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. परंतु कधी कधी बटाटे आरोग्यासाठी तितके चांगले मानले जात नाही, हे देखील आपल्याला माहित आहे. त्यामुळे यात किती तथ्य आहे ते जाणून घेऊया.
प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्ट कडून बटाट्यांशी संबंधित अनेक गुपितं उघड
बटाटा हे एक कंदमुळ आहे, जो बहुतेक घरांमध्ये वापरले जाते. वय कितीही असो, बटाटा जगभरात सर्वात लोकप्रिय आहे. काही लोक ते फ्राय करून खातात, काही लोक वाफवून खातात. लहानांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनाच बटाट्याचे वेड असते, पण बटाट्याबद्दल असेही म्हटले जाते की ते जास्त प्रमाणात खाल्ल्याने लठ्ठपणा येतो. बटाटे खाल्ल्याने वजन आणि लठ्ठपणा वाढतो की नाही हे आम्ही तुम्हाला सांगतो. यात कितपत तथ्य आहे? एका प्रसिद्ध न्यूट्रिशनिस्टने बटाट्यांशी संबंधित अनेक गुपिते उघड केली आहेत. पोषणतज्ञांचे म्हणणे आहे की इतर भाज्यांच्या तुलनेत बटाट्यामध्ये कार्बोहायड्रेट आणि कॅलरी दोन्ही जास्त प्रमाणात असतात. त्यात पोटॅशियम, फायबर, मँगनीज, व्हिटॅमिन बी 6, व्हिटॅमिन सी आणि अँटिऑक्सिडंट्ससह इतर पोषक घटक असतात. बटाट्यामध्ये रेझिस्टन्स टाईप स्टार्च देखील असतो, जो आतड्यांच्या आरोग्याची काळजी घेतो.
बटाटे मध्ये स्टार्च किती असते?
बटाट्यांमधील स्टार्चचे प्रमाण त्यांच्या पोषक तत्वानुसार परिवर्तित होऊ शकते. साधारणपणे, ताज्या बटाट्यामध्ये 60-80% स्टार्च असते, यापैकी 70-80% स्टार्च अमायलोपेक्टिन असते आणि हे खाण्याचे सर्वात मोठे नुकसान आहे. का आणि कसे, ही सुरुवात समजून घेऊ.
Amylopectin स्टार्च लठ्ठपणा वाढवते
यातील अमायलोपेक्टिन स्टार्च हा ग्लायसेमिक इंडेक्स असतो, याचा अर्थ ते खाल्ल्यानंतर रक्तातील साखर लवकर वाढू शकते. याचा भरपूर आहार घेतल्यास इन्सुलिन, कोलेस्ट्रॉल आणि ट्रायग्लिसराइडची पातळी देखील वाढू शकते. यामुळे इन्सुलिन रेझिस्टन्स आणि फॅट स्टोरेज होते, या सर्वांशिवाय बटाट्यामध्ये कॅलरीजचे प्रमाण जास्त असते. या कारणास्तव, जास्त प्रमाणात बटाट्याचे सेवन केल्याने लठ्ठपणा वाढू शकतो. त्यामुळे, जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रित करायचे असेल तर जास्त बटाटे खाणे टाळा. तुम्ही जरी खाल्ले तरी एका दिवसात 1 पेक्षा जास्त बटाटा खाऊ नका, असा सल्ला देण्यात आला आहे.
(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Health News : चहात दुध घालून पिणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी! रिकाम्या पोटी पित असाल धोक्याची घंटा, जाणून घ्या याचे तोटे