Valentine Week 2022 : लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच चॉकलेट्स खायची आवड असते. डार्क चॉकलेट, व्हाइट चॉकलेट आणि मिल्क चॉकलेट असे अनेक प्रकारचे चॉकलेट्स बाजारात मिळतात. सध्या  'व्हॅलेंटाईन वीक' ( Valentine Week ) सुरू आहे. 'व्हॅलेंटाईन वीक'चा आज तिसरा दिवस. हा दिवस चॉकलेट डे (Chocolate Day) म्हणून साजरा केला जातो. 'चॉकलेट डे' च्या दिवशी प्रिय व्यक्तीला चॉकलेट देऊन तुम्ही तुमच्या भावना व्यक्त करू शकता. चॉकलेट खाल्ल्यानं दात किडतात किंवा त्रास होतो, असं अनेकांचे मत आहे. पण चॉकलेट खाणं हे आरोग्यासाठी फायदेशिर आहे, हे काही लोकांना महित नसेल. जाणून घेऊयात चॉकलेट खाण्याचे फायदे...


डार्क चॉकलेटमध्ये फायबर, लोह, कॉपर  यांसारखे घटक असतात. तसेच चॉकलेटमध्ये कोको बीन असते. कोको बीनमध्ये फ्लावनोल्स असते. यामुळे पेशींचे संरक्षण करण्याची क्षमता असते. तसेच चॉकलेट डार्क चॉकलेट योग्य प्रमाणात खाल्ल्यानं ह्रदयासंबंधित त्रास दूर होतात. चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन असते, जे तुम्हाला आनंदी करते. मानसिक स्वास्थ देखील चॉकलेट खाल्ल्यानं चांगले राहते. हॉट चॉकलेट मिल्क तसेच व्हाईट चॉकलेट, चॉकलेट आईस्क्रिम हे चॉकलेटचे पदार्थ तुम्ही खाऊ शकता. डार्क चॉकलेट खाल्ल्याने  ब्लड फ्लों चांगला होतो. चॉकलेटमधील ट्रिप्टोफॅन मेंदूमधील इंडॉरफिनच्या पातळीवर प्रभावशील ठरतं. 


चॉकलेट खाल्ल्यानं वजन होईल कमी 
योग्या प्रमाणात चॉकलेट खाल्ल्यानं वजन देखील कमी होतं, असं कॅलिफोर्नियाच्या सॅन डिगो विद्यापीठात करण्यात आलेल्या संशोधानामुळे स्पष्ट झालं. 


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha