Green Tea Benefits: अनेक लोक साध्या चहा ऐवजी ग्रीन टी पित आहेत. ग्रीन-टी वजन कमी करण्यास मदत करते हे तर सर्वांना  माहित आहे.  ग्रीन-टी रोज प्यायल्याने शरीराची हाडे मजबूत होतात. जाणून घेऊयात ग्रीन टी पिण्याचे फायदे- 


कोलेस्ट्रॉल नियंत्रणात आणते- 
ग्रीन-टीमध्ये कॅटेचिन नावाचे अॅंटीऑक्सीडेंट असते, जे आपण जे पदार्थ खातो, त्यामधील  कलेस्ट्रॉल शोशून घेण्याची शरीराची क्षमता कमी करते. त्यामुळे जे लोक दिवसातून दोन वेळा ग्रीन टी पितात त्यांना ह्रदया संबंधितचे आजार होत नाहित. 


हडे मजबूत होतात-
ग्रीन-टी प्याल्यामुळे हडे मजबूत होतात. ग्रीन-टीमध्ये असणारे फ्लॅवेनॉयड हे हड्डांची झिज होऊ देत नाही. त्यामुळे ज्यांना हडांच्या समस्या आहेत, त्यांनी रोज ग्रीन-टी पिला पाहिजे.  


मानसिक आरोग्यासाठी- 
शारीरीक आरोग्याबरोबरच तुमचे मानसिक आरोग्य देखील चांगले असले पाहिजे. ग्रीन टीमध्ये असणारी पोषक तत्वे तुमची बौधिक क्षमता वाढवण्यास मदत करतात. तसेच ग्रीन-टी पिल्यानंतर तुम्हाला झोप देखील लागणार नाही. 


वजन कमी करते-
अनेक लोक वजन कमी करण्यासाठी प्रयत्न करत असतात. वजन कमी करण्यासाठी नियमीत डाएट आणि व्यायाम  लोक करतात. पण दररोज ग्रीन टी प्यायल्याने तुमचे वजन कमी होते. तसेच ग्रीन टीमध्ये असणारे कॅफेन शारीरिक सुंदरता वाढण्यास मदत करते. त्यामुळे रोज दोन कप ग्रीन टी पिला पाहिजे.  


Health Care Tips: 'या' लोकांनी चुकूनही करू नये दुधासोबत हळदीचे सेवन; आरोग्यावर होतील वाईट परिणाम


इंजेक्शन घेतल्यानंतर ज्या ठिकाणी वेदना होत आहेत तेथे ग्रीन टीची भिजवलेली टी बॅग ठेवल्याने आराम मिळेल. 


Weight Loss Tips : पोट कमी करण्यासाठी सोप्या वर्कआउट टिप्स; काही दिवसांतच दिसेल परिणाम


Kiara Advani Fitness Routine: परफेक्ट फिगर अन् हेल्दी स्किन; कियारा अडवाणीच्या फिटनेसचं 'हे' गुपित


टिप: वरील माहितीची पुष्टी एबीपी माझा करत नाही. कोणतेही उपचार, डाएट आणि औषधे हे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार घ्यावेत.