नाशिक : अखिल भारतीय मराठी 94 वे साहित्य संमेलन गोदातीरी कविश्रेष्ठ कुसुमाग्रज नगरीत होत आहे. खगोल शास्त्रज्ञ अध्यक्ष लाभल्यानं आजवर झालेल्या साहित्य संमेलनाचा तुलनेत यंदाचे साहित्य संमेलन बहारदार करण्याचा आयोजकांचा प्रयत्न आहे. मात्र अद्याप साहित्य संमेलनाला उद्घाटक मिळालेला नाही.
78 व्या साहित्य संमेलनानाचे यशस्वी आयोजन केल्यानंतर गोदा काठावर डिसेंबरच्या गुलाबी थंडीत नाशिकमध्ये सारस्वतांचा मेळा भरणार आहे. 3 ते 5 डिसेंबर दरम्यान भुजबळ नॉलेज सिटीमध्ये 94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन भरणार आहे. खगोल शास्त्रज्ञ विज्ञान लेखक जयंत नारळीकर या संमेलनाचे अध्यक्ष आहेत. त्यामुळे विज्ञानवादी साहित्य संमेलन या संमेलनाचा पाया आहे, बालसाहित्य, कवीकट्टा, कथाकथन, ग्रंथ दिंडी, असे भरगच्च कार्यक्रम साहित्य संमेलनात आहेत
शेतकऱ्यांची दुस्थिती आंदोलने, राजसत्ताचा निर्दयीपणा, मराठी नाटक एक पाऊल पुढे, दोन पावले मागे, कोरोनानंतरचे अर्थकारण मराठी साहित्य व्यवहार, ऑनलाइन वाचन वाङ्मय विकासाला तारक की मारक
साहित्य निर्मितीची कार्यशाळा गरज की थोतांड, गोदतीराच्या सतांचे योगदान, नाशिक जिल्ह्याला 151 वर्ष पूर्ण झाल्याबाबत जिल्ह्याचा जागर अशा परिसंवादाची मेजवानी अनुभवायला मिळणार आहे.
Sahitya Sammelan : नाशिकच्या अ.भा. साहित्य संमेलनाच्या तारखांवर शिक्कामोर्तब
दिलीप प्रभावळकर, शफाअत खान, सुबोध भावे, कवी सौमित्र यांसह ज्येष्ठ साहित्यिक,कवी लेखकांना ऐकण्याची संधी नाशिककरांना मिळणार असून सर्व रूपरेषा तयार आहे. मात्र संमेलनाच्या उद्घघटन आणि समारोपाला कोणाला बोलवायचे याबाबत मात्र अद्याप एकमत झाले नाही , चार ते पाच नावामधून लवकरच उद्घटकाचे नाव जाहीर होणार आहे.
कोरोना महामारीच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे संमेलनाची शक्यता धूसर झाली होती. संसर्ग आटोक्यात आल्यानंतर संमेलन होण्यातील अडथळे दूर झाले. ऑगस्टमध्ये संयोजन समिती आणि साहित्य महामंडळ यांची बैठक झाली. त्यावेळी 19, 20,21 नोव्हेंबर या तारखांना संमेलन घेण्याबाबत संयोजन समितीने सांगितले. त्यानंतर महामंडळ आणि संयोजन समिती यांच्यात दोन वेळा पत्रव्यवहार झाला. त्यात या तारखा समोर आल्या. या तारखाही राज्य शासनाला कळवण्यात आल्याचं समजतेय. 19, 20,21 नोव्हेंबर या तारखांवर आम्ही सकारत्मक आहोत. या तारखा शासनाला माहिती म्हणून पाठविल्याचं कौतिकराव ठाले-पाटील यांनी सांगितलं.