Health Care Tips : आजकालच्या या धकाधकीच्या जीवनात तुम्हाला अनेकदा थकवा जाणवतो का? नियमित हलका व्यायाम (Excercise) करूनही तुम्हाला अशक्तपणा किंवा थकवा जाणवत असेल तर तुमच्या शरीरात सहनशक्तीची (Stamina) कमतरता आहे. होलिस्टिक हेल्थ एक्सपर्ट डॉ. मिकी मेहता सांगतात की स्टॅमिना कमी होणे हे कोणत्याही आजारामुळे होत नसून त्यामागे अनेक कारणे असू शकतात.


काही लोकांचा असा विश्वास आहे की, फक्त खेळाडूंनाच स्टॅमिनाची गरज असते. पण सामान्य माणसालाही स्टॅमिन्याची तितकीच गरज असते. दैनंदिन कामासाठी ऊर्जा म्हणजेच क्षमता खूप महत्त्वाची आहे. या संदर्भात डॉ. मिकी मेहता म्हणतात की, जर तुम्ही तुमच्या आहारात 5 पदार्थांचा समावेश केला तर ते आठवड्याभरातच तुमचा स्टॅमिना वाढण्यास सुरुवात होईल. हे पदार्थ नेमके कोणते आहेत त्याविषयी जाणून घेऊयात. 


हिरव्या पालेभाज्या 


डॉक्टर मिकी मेहता सांगतात की, हिरव्या पालेभाज्यांमध्ये जीवनसत्त्वे, खनिजे आणि फायबरसह अनेक गोष्टी आढळतात. हे खाल्ल्याने आपला स्टॅमिना वाढतो. पालक, मेथी, मुळा यांसारख्या हिरव्या भाज्यांमध्ये लोह मुबलक प्रमाणात आढळते. हे खाल्ल्याने शरीरात हिमोग्लोबिनही पूर्ण राहते.


बिया आणि नट्स


सुका मेवा आणि बिया आरोग्यासाठी खूप फायदेशीर मानल्या जातात. त्यामध्ये असलेले बायोएक्टिव्ह कंपाऊंड्स आणि अँटीऑक्सिडंट्स ग्लायसेमिक इंडेक्स कमी ठेवतात, ज्यामुळे आपले शरीर निरोगी राहते. यातील ओमेगा 3 आपल्या मेंदूला निरोगी ठेवण्यास मदत करते. 


दही


दही हा हलक्या अन्नाचा पदार्थ आहे. त्यामुळे दही सहज शरीरात पचतं. याशिवाय, हे कॅल्शियम आणि प्रोटीनचा चांगला स्रोत आहे. हे व्यायामापूर्वी आणि रिकाम्या पोटी खाण्यासाठी एक अतिशय आरोग्यदायी अन्न आहे. दह्यात काही फळे घालून तुम्ही तुमचा स्टॅमिना वाढवू शकता.


अक्खे दाणे


संपूर्ण धान्य देखील आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्वारी, बाजरी आणि नाचणी खाल्ल्याने शरीराला आवश्यक जीवनसत्त्वे आणि फायबर तर मिळतातच पण ते खाल्ल्याने स्टॅमिनाही वाढतो. हे पदार्थ शरीराला ऊर्जा देण्याचे काम करतात.या पदार्थांचा जर तुम्ही तुमच्या आहारात समावेश केला तर तुम्हाला भरपूर फायदे मिळतील. 


(टिप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. त्यामुळे शरीराच्या कोणत्याही समस्येवर कोणताही उपाय करण्यापूर्वी तज्ज्ञांचा सल्ला घेणं गरजेचं आहे.)


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Skin Care Tips : चेहरा 3-4 वेळा नाही तर, दिवसातून 'इतक्या' वेळा धुवा; त्वचा तजेलदार होईल