Health benefits of playing outside : लहान मुलांना बाहेर खेळायला दिल्याने मुलांमध्ये लीडरशिप क्वालिटी विकसित होते. त्यामुळे त्यांच्यामध्ये टीमने काम करण्याची वृत्तीही निर्माण होते. याबरोबरच घरापासून दूर गेल्यावर त्यांच्यामध्ये सामाजिक प्रश्नांबाबतही जागरुकता निर्माण होते. त्यामुळे लहान मुलांसाठी बाहेर खेळणं (Health benefits of playing outside) आरोग्याच्या दृष्टीने देखील किती महत्त्वाचं आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.   

Continues below advertisement


दृष्टी सुधारण्यास मदत होते


ऑप्टोमेट्रिस्टने केलेल्या अभ्यासात असे आढळून आले आहे की, जी मुलं घराबाहेर वेळ घालवतात त्यांची दूरदृष्टी प्रामुख्याने घरामध्ये खेळणाऱ्या मुलांपेक्षाही चांगली असते.


सामाजिक कौशल्यांना प्रोत्साहन मिळते


तज्ञांच्या म्हणण्यानुसार, मुलांना बाहेर घेऊन जाण्याने विविध कौशल्ये विकसित होतात. मुलं एकमेकांशी संवाद साधतात. मैत्री वाढते. आणि एकोप्याची भावनादेखील निर्माण होते. तसेच, सामाजिक मूल्यांचेही भान राहते. 


अटेंशन स्पॅन वाढतो


अभ्यासातून असे दिसून आले आहे की, मोकळ्या वातावरणात गेल्यानंतर मुलांमध्ये ADHD लक्षणे कमी होतात. मोकळ्या वातावरणात गेल्याने मुलांमध्ये स्क्रिन टाईम कमी होतो. त्यामुळे मुलांची दृष्टी देखील सुधारते. तसेच, मोकळ्या वातावरणात गेल्याने मुलांचा थेट निसर्गाशी संपर्क येतो. त्यामुळे, मुलांची चिडचिड देखील कमी होते.   


ताणतणाव कमी होण्यास मदत होते


मुलांच्या आयुष्यात खेळ अत्यंत गरजेचा आहे. बाहेर खेळल्याने मुलांचा तणाव कमी होतो. त्यामुळे तणावावर मात करण्यासाठी बाहेर खेळणं हा एक उत्तम पर्याय आहे.    


व्हिटॅमिन डी प्रदान करते


अनेक मुलांमध्ये व्हिटॅमिन डीच्या कमतरतेचा अभाव असतो. व्हिटॅमिनचे डी अनेक आरोग्य फायदे आहेत, ज्यात भविष्यात मुलांना हाडांच्या समस्या, मधुमेह आणि हृदयविकारापासून बचाव होतो. सूर्य हा आवश्यक जीवनसत्त्वांचा उत्तम स्रोत आहे. त्यामुळे, तुमच्या मुलांना काही मिनिटे सनस्क्रीन न लावता बाहेर खेळायला सांगा आणि नंतर तुम्ही त्यांच्यावर काही लागू करू शकता.


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : गुलाबी थंडीत 'या' चहाने तुमच्या दिवसाची सुरुवात करा; प्रतिकारशक्ती वाढविण्याबरोबरच व्हायरलपासूनही संरक्षण मिळेल