Happy Teddy Day 2022 : दर वर्षी 14 फेब्रुवारी रोजी व्हॅलेंटाईन डे (Valentine’s Day) साजरा केला जातो. त्या आधी एक आठवडा व्हॅलेंटाईन विक साजरा केला जातो. आज (10 फेब्रुवारी) टेडी डे (Teddy Day) साजरा केला जाणार आहे. या दिवशी प्रेमी युगुल एकमेकांना टेडी गिफ्ट करतात. बाजारात 100 रूपयांपासून दोन हजार रूपयांपर्यंतचे टेडी मिळतात. . 


पार्टनरला गिफ्ट द्या हा टेडी


एखाद्या व्यक्तीबद्दल आपले प्रेम व्यक्त करण्यासाठी टेडी डे साजरा केला जातो. तुम्हाला तुमच्या भावना किंवा प्रेम व्यक्त करायचे असेल तर त्यांना टेडी डे दिवशी टेडी गिफ्ट करावा. टेडी हा प्रेम, काळजी आणि आपुलकीचे प्रतिक आहे.  टेडी हा मुलींच्या मित्रासारखा असतो. त्यामुळे जर तुम्ही तुमच्या पार्टनरला टेडी गिफ्ट केला तर तो त्यांचा जवळचा मित्र होईल. हातात ह्रदय असणारा टेडी तुम्ही गिफ्ट करू शकता. जर तुम्हाला तुमच्या पार्टनरसोबत राहायचं असेल तर दोन टेडी जोडलेला टेडी द्या.  लाल, गुलाबी आणि पांढऱ्या रंगाचा टेडी तुम्ही गिफ्ट देऊ शकता. जर तुमचा पार्टनर पेट लवर असेल तर कॅटचा किंवा यूनिकॉनचा टेडी तुम्ही देऊ शकता. 


टेडी बिअरची सुरूवात अमेरिकेतून सुरू झाली. जेव्हा मिसीसिपी आणि लुझियानातील सीमा वाद समोर आला होता. त्यावेळी अमेरिकेचे अध्यक्ष थेयोडोर रुझवेल्ट होते. रूझवेल्ट हे अमेरिकेचे 26 वे अध्यक्ष होते. रुझवेल्ट एक राजकारणी होतेच त्याचबरोबर ते एक चांगले लेखक देखील होते. मिसिसिपी आणि लुझियानातील वाद मिटविण्यासाठी रुझवेल्ट मिसिसिपीच्या भेटीला गेले होते. समस्या समजून घेण्यासाठी त्यांनी मोकळ्या वेळात मिसिसिपी जंगलाला भेट दिली.या वेळी त्यांनी झाडाला बांधलेल्या जखमी अस्वलाला पाहिले. या अस्वलाला कोणीतरी बांधले होते. अस्वल तळमळत होता. रुझवेल्टने अस्वलाला सोडले पण त्याला गोळी घालण्याचा आदेश दिला. जेणेकरून त्याला त्रासातून आराम मिळू शकेल. अमेरिकेत या घटनेची सर्वत्र चर्चा होती. या घटनेशी संबंधित एक व्यंगचित्र एका नामांकित वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले. हे व्यंगचित्र व्यंगचित्रकार बेरीमन यांनी बनविलेले अस्वल लोकांना आवडले.अमेरिकेच्या टॉय स्टोअरचे मालक मॉरिस मिचटॉम अस्वलच्या व्यंगचित्रातून इतके प्रभावित झाले. त्यांनी या अस्वलाचा आकार असलेले एक खेळणे त्याचे नाव टेडी बिअर ठेवले. त्याचे नाव रुझवेल्ट असे ठेवले गेले. कारण रुझवेल्ट यांचे टोपणनाव 'टेडी' होते.राष्ट्रपतींकडून त्यांच्या नावावर हे खेळण्याचे नाव ठेवण्याची परवानगी मिळाल्यानंतर ते बाजारात आणले गेले. लोकांना ते इतके आवडले की त्याची विक्री लगेच झाली. तेव्हापासून हे नाव लोकप्रिय झाले आहे. जगातील पहिले टेडी बिअर अजूनही इंग्लंडच्या पीटरफिल्डमध्ये सुरक्षित ठेवले आहे. 1984 मध्ये ठेवले आहे.


संबंधित बातम्या:



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha