Promise Day 2024 : व्हॅलेंटाईन वीक (Valentine Week) सुरू झाला आहे. व्हॅलेंटाईन डे (Valentine Day) दरवर्षी 14 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो, पण त्यापूर्वीच 7 फेब्रुवारीपासून विविध डे साजरे केले जातात. व्हॅलेंटाईन वीकची सुरुवात 7 फेब्रुवारीला रोज डेपासून (Rose Day) होते, त्यानंतर प्रपोज डे (Propose Day), मग चॉकलेट डे (Chocolate Day), 10 फेब्रुवारीला टेडी डे (Teddy Day) आणि त्यानंतर आज, म्हणजेच 11 फेब्रुवारीला प्रॉमिस डे (Promise Day) साजरा केला जातो.
आज प्रॉमिस डेच्या (Promise Day) दिवशी तुम्ही तुमच्या जोडीदाराला खास संदेश (Promise Day Marathi Quotes) पाठवू शकता आणि प्रेमाचे वचन देऊ शकता, यामुळे तुमचं नातं पूर्वीपेक्षा अधिक घट्ट होईल. तुम्ही प्रॉमिस डेच्या दिवशी हे खास मेसेज पाठवून तुमच्या मनातील भावना व्यक्त करू शकता. प्रॉमिस डेला तुम्ही तुमच्या जोडीदाराला कायम साथ देण्याचं वचन देऊ शकता.
प्रॉमिस डे शुभेच्छा (Promise Day Quotes Marathi)
- आजन्म साथ देशील असे वचन दे मला,नेहमीच पदोपदी खुश ठेवीन मी तुला,सोडून कधी जाऊ नकोस तू मला,मी आयुष्यभर साथ देईल तुला!
- मला वचन दे, प्रेमात कधीच दुरावा येणार नाही!खरंच माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर, कधीच मला सोडून जाणार नाही!…प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!
- एक Promise माझ्याकडून,जेवढे सुख तुला देता येईल तेवढे देईल,काहीही झाले तरी मी शेवटपर्यंत साथ मात्र तुलाच देईल…
- तु माझ्या आयुष्यातील मोलाचा क्षण,प्रत्येक वेळी येते तुझी आठवण,राहू दे सदैव असेच प्रेम तुझे माझ्यावर,हेच प्रॉमिस करुया एकमेकांना आपण!
- तु माझ्यासाठी बेस्ट आहेस त्यामुळेतु कायम माझ्यासोबत रहा,आपण दोघे मिळून पृथ्वीवर स्वर्ग बनवू.प्रॉमिस डे च्या हार्दिक शुभेच्छा!
- तुझा हात जो आता कायम धरला आहे,तो कधीही न सोडण्यासाठी.Happy Promise Day!
- तू दिलेलं वचन खोटं आहेअसं कधीच समजणार नाहीआजही तुझी वाट बघतोयआणि उद्याही बघणारतुला विसरून जाणंमला कधीच जमणार नाहीHappy Promise Day!
- वचन दे आयुष्यभरासाठी की तु सदैव माझ्यापाशी राहशीलकोणत्याही सुख-दुखात तु साथ माझी देशीलकधीही आयुष्यात मागे पडलो तरीही तुच मला समजून घेशीलहॅपी प्रॉमिस डे
हेही वाचा: