Hair Care Tips : प्रत्येक मुलीला तिचे केस सुंदर, दाट, सॉफ्ट आणि चमकदार असावेत असं वाटतं. यासाठी ते एक ना अनेक उपाय करतात. अनेक मुलांला लांब, घनदाट केसांची आवड असते. पण तेल मसाज, केसांची योग्य निगा राखणे, नैसर्गिक शॅम्पू कंडिशनर आणि घरगुती उपाय करूनही त्यांचे केस एका टप्प्यावर थांबतात आणि त्यापलीकडे फारशी वाढ होत नसल्याचे दिसून येते. तुम्ही कधी विचार केला आहे का की असं का होत असेल? कदाचित हा मायक्रो ब्रेकेजचा त्रास असू शकतो. मायक्रो ब्रेकेज म्हणजे नेमकं काय? या संबंधित अधिक माहिती जाणून घेऊयात.
मायक्रो ब्रेकेज म्हणजे काय?
सर्वात आधी, हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे की केसांची वाढ अनुवांशिक आहे, म्हणजेच तुमचे केस केवळ एका विशिष्ट लांबीपर्यंत वाढतात आणि त्यानंतर ते वाढण्याचे थांबतात. अमेरिकन ऍकॅडमी ऑफ डर्मेटोलॉजीने देखील यावर संशोधन केले आणि असे आढळले की केसांच्या सूक्ष्म तुटण्यामुळे केसांचे नुकसान होते. यामुळे तुमचे केस मुळापासून कमकुवत होतात आणि केस मधूनच तुटू लागतात. तुम्ही मायक्रो ब्रेकेजचे बळी आहात की नाही हे जाणून घ्यायचे असेल, तर तुमचे तुटलेले केस घ्या आणि केसांच्या लांबीनुसार मोजा, जर हे केस लहान असतील तर समजून घ्या की तुम्ही मायक्रो ब्रेकेजचे बळी आहात.
मायक्रो ब्रेकेज कसे टाळावे?
- मायक्रो ब्रेकेज टाळण्यासाठी तुम्ही हार्मोनल टेस्ट करणे आणि तुमच्या आहारातील पोषणाची काळजी घेणे सर्वात महत्त्वाचे आहे.
- सूक्ष्म तुटणे टाळण्यासाठी, केस विंचरताना रुंद टूथ कॉम्ब किंवा केसांचा ब्रश वापरा, कारण यामुळे केस तुटण्याचे थांबतात.
- स्ट्रेटनर, कर्लर्स किंवा ब्लो ड्रायर्स सारख्या हीट स्टायलिंग टूल्सचा वापर कमी करा, कारण ते तुमचे केस अधिक ठिसूळ बनवतात आणि अधिक सूक्ष्म तुटू शकतात.
- तुमचे केस मजबूत करण्यासाठी, तुम्ही नियमितपणे केसांना तेल आणि सीरम लावणं गरजेचं आहे. तसेच, केस हायड्रेटेड ठेवणं गरजेचं आहे.
- केसांसाठी काही सप्लिमेंट्स आणि न्यूट्रिएंट्स आवश्यक आहेत, ज्यामध्ये व्हिटॅमिन ई, व्हिटॅमिन डी, व्हिटॅमिन सी, लोह, झिंक, ओमेगा 3 फॅटी अॅसिड आणि व्हिटॅमिन बी घेणे आवश्यक आहे.
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
महत्त्वाच्या बातम्या :