Hair Care Tips : प्रत्येकालाच आपले केस (Hair Care Tips) सुंदर आणि घनदाट असावेत असं वाटतं. पण त्याचबरोबर केस  सॉफ्ट असणं फार गरजेचं आहे. मात्र, प्रत्येकाचेच केस सॉफ्ट नसतात.  कोरडे केस तुमचं सौंदर्य कमी करतात. त्यांना सेट करणं खूप कठीण असतं. जेव्हा केस विंचरले जातात तेव्हा अर्ध्याहून अधिक केस कंगव्यानेच बाहेर येतात. जर तुम्हालाही कोरड्या केसांचा त्रास होत असेल तर सर्वात आधी त्या मागचं कारण जाणून घेणं गरजेचं आहे.  


केमिकल बेस्ड शॅम्पूचा वापर, जास्त सूर्यप्रकाश, ताणतणाव आणि खाण्यापिण्याच्या चुकीच्या सवयी अशा अनेक गोष्टींमुळे तुमचे केस कोरडे आणि निर्जीव होऊ शकतात. त्यामुळे या गोष्टींकडे आधी लक्ष देणं गरजेचं आहे. याशिवाय काही घरगुती उपायांनीही तुम्ही या समस्येपासून सुटका करू शकता. चला तर जाणून घेऊयात.


केळी


एक पिकलेलं केळं घ्या. त्यात दोन चमचे मध आणि 1/3 कप खोबरेल तेल घाला. हे मिश्रण साधारण अर्धा तास केसांवर ठेवा. नंतर केस स्वच्छ धुवा. केसांचा कोरडेपणा काही दिवसांत दूर होऊ लागेल.


मध


केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी केसांच्या लांबीनुसार एक किंवा अर्धा कप पाणी घ्या. त्यात एक चमचा मध घाला. नंतर केसांना लावा अर्ध्या तासानंतर सामान्य पाण्याने केस धुवा.


खोबरेल तेल


खोबरेल तेल कोरड्या केसांवर खूप प्रभावी आहे. हे तेल केवळ कोरडेपणाची समस्या दूर करत नाही तर केसांना खोलवर मॉइश्चरायझ करते आणि त्यांची लांबी देखील वाढवते. कोरडेपणा दूर करण्यासाठी खोबरेल तेल थोडे गरम करून केसांना लावा आणि किमान अर्धा तास ठेवा आणि नंतर शॅम्पू करा. हे आठवड्यातून 2-3 वेळा करा.


दही आणि कोरफड


दह्यामध्ये असलेले प्रोटीन केसांसाठी खूप फायदेशीर आहे आणि कोरफड केसांशी संबंधित बहुतेक समस्यांवर रामबाण उपाय आहे. यासाठी कोरफडीचे जेल आणि दही प्रत्येकी एक चमचा घेऊन ते चांगले मिसळून मिश्रण बनवा. या मिश्रणाने टाळूला 5 मिनिटं मसाज करा, सुमारे 10 मिनिटे ठेवा आणि नंतर शॅम्पू करा.


सफरचंद व्हिनेगर


केसांचा कोरडेपणा दूर करण्यासाठी दोन चमचे सफरचंद सायडर व्हिनेगर दोन कप पाण्यात मिसळा. शॅम्पू केल्यानंतर, सफरचंद सायडर व्हिनेगरच्या पाण्याने केस धुवा, काही वेळ केसांवर राहू द्या आणि नंतर सामान्य पाण्याने धुवा. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Health Tips : तुम्हीसुद्धा रोज 6 तासांपेक्षा कमी झोपता का? यामुळे तुमच्या हृदयाला पोहोचतो धोका; चांगल्या झोपेसाठी 'या' टिप्स फॉलो करा