Hair Care Tips : आजकाल केसगळतीची (Hair Care Tips) समस्या लोकांमध्ये सामान्य झाली आहे. वाढतं प्रदूषण, विविध प्रकारचे केमिकलयुक्त प्रोडक्ट्स आणि इतर अनेक कारणांमुळे केसगळतीचा त्रास होऊ शकतो. केस गळणे आणि तुटणे हे देखील अनेक लोकांमध्ये तणावाचे कारण ठरतंय. कारण यामुळे केस खूप पातळ होऊ लागतात. अशा परिस्थितीत जर तुम्हाला तुमचे केस घट्ट आणि मजबूत करायचे असतील तर या ठिकाणी आम्ही तुम्हाला काही सोप्या घरगुती उपायांचा वापर कसा करायचा हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला घरी उपलब्ध असलेल्या काही गोष्टींपासून फेसमास्क बनवावा लागेल. चला जाणून घेऊयात या मास्क बनवण्याबद्दल.
अंड्याचे केसांचा मास्क बनवा
अंड्यांमध्ये प्रथिने मुबलक प्रमाणात असतात. जे आपल्या केसांसाठी देखील खूप महत्वाचे आहे. अशा परिस्थितीत तुम्ही केसांना अंड्याचा मास्क देखील लावू शकता. हा मास्क केसांना लावल्याने टाळूला ओलावा मिळतो. हा मास्क बनवण्यासाठी 2 अंडी आणि 2 चमचे ऑलिव्ह ऑईल घ्या. हे मिश्रण चांगले मिक्स करा. त्यानंतर अर्धा तास केसांना लावा. यानंतर केस शॅम्पूने धुवा. आठवड्यातून एकदा हा फेसमास्क लावा. काही आठवड्यांनंतर तुम्हाला तुमच्या केसांमध्ये फरक दिसेल.
दही आणि मधाचा फेसमास्क
दही आणि मधाचा फेसमास्क करण्यासाठी अर्धा कप दह्यात 3 ते 4 चमचे साखर आणि थोडं ऑलिव्ह ऑईल घालून चांगले मिक्स करा. त्यानंतर हा मास्क तुमच्या टाळूवर आणि केसांवर नीट लावा. 20 ते 25 मिनिटे तसेच ठेवा. यानंतर आपले केस शॅम्पूने धुवा. हा फेसमास्क देखील आठवड्यातून एकदाच लावा. हा मुखवटा केसांची वाढ आणि केसांचा घनदाटपणा दोन्हीमध्ये मदत करू शकतो.
मेथीचे दाणे आणि दही
यासाठी अर्धा कप दह्यामध्ये 1 चमचा मेथीच्या बियांची पावडर मिक्स करा. तसेच या मिश्रणात थोडं ऑलिव्ह ऑईल आणि पाणी घाला. आता ते साधारण 2 तास ठेवा आणि नंतर आपल्या टाळूवर लावा. 20 ते 25 मिनिटे लावून केस झाकून ठेवा आणि नंतर शॅम्पूने केस धुवा. यामुळे केसांची वाढ आणि केस तुटण्याच्या समस्येपासूनही आराम मिळू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या :
टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही.
Hair Care Tips : केसांतून सतत कोंडा पडतोय? 'या' गोष्टींचा वापरून पाहा; 15 दिवसांतच फरक दिसेल