Hair Care Tips : असं म्हणतात की प्रत्येक गोष्टीची योग्य वेळ असते. अवेळी कोणतीही गोष्ट घडल्यास ती डोळ्यांत लगेच खटकते. त्याच पद्धतीने जर तुम्हाला वयाच्या आधीच तुमच्या केसांवर (Hair Care Tips) पांढरे केस दिसू लागले तर नजर पटकन तिथेच जाते. अनेकजण पांढरे केस दिसताच त्यांना तोडून टाकतात. यामुळे त्यांना एक समाधान देखील मिळतं. पण, सर्वात गमतीशीर गोष्ट म्हणजे अनेकदा आपण लोकांना हे बोलताना ऐकलं असेल की पांढरे केस तोडल्याने त्यावर पांढरे केस फार वेगाने येऊ लागतात.

  


हे ऐकल्यानंतर प्रत्येकालाच पांढरे केस तोडल्यानंतर लगेच केस पांढरे होतात का असा प्रश्न पडणं साहजिक आहे. आता या गोष्टीमध्ये कितपत सत्य आहे हे या ठिकाणी आपण जाणून घेणार आहोत. डॉक्टरांच्या मते, वयाच्या आधी केस पांढरे होणे हे तुमची अस्वस्थ जीवनशैली, पोटात साफ न होणे आणि इतर कारणांमुळे तुमचे केस पांढरे होतात. 


तर, अनेक आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, आपल्या केसांत फॉलिकल्स असतात आणि केस याच फॉलिक्लसमध्ये वाढू लागतात. केसांच्या फॉलिकल्समध्ये मेलेनोसाईट्स असतात जे मेलेनिन तयार करण्याचं कार्य करतात. केसांच्या रंगांमध्ये मेलेनिन सर्वात महत्त्वाची भूमिका बजावतात. तसेच, केसांचा रंग नैसर्गिकरित्या टिकवून ठेवण्यास मदत करतात. यामागे इतर अनेक कारणं असू शकतात. जसे की, वाढतं वय, अयोग्य आहार, तणाव, चिंता, केमिकलचा जास्त वापर, आनुवंशिक इ. 


एक केस तोडल्याने इतर काळे केसही पांढरे होतात


या संदर्भात डर्मटोलॉजिस्टचं असं म्हणणं आहे की, तुम्ही एक पांढरा केस तोडला की तुमचे इतरही काळे केस पांढरे होऊ लागतात या गोष्टीत कोणतेही तथ्य नाहीये. इंग्लिश पोर्टल हेल्थ साईटने दिलेल्या अहवालानुसार, हा पूर्णपणे चुकीचा गैरसमज आहे. केसांच्या रंगाचे खास केमिकल हे मेलेनिन असते. तुमच्या केसांतील मेलेनिन कमी झाल्यानंतर तुमचे केस पांढरे होऊ लागतात. याच कारणामुळे काळे केस पांढरे होऊ लागतात. मेलेनिन अनेक कारणांमुळे कमी होऊ शकते. एक पांढरा केस तुटल्याने मेलेनिनवर फारसा फरक पडत नाही. एक पांढरा केस तोडल्याने त्याच जागी पुन्हा पांढरा केस येऊ लागतो. तुमच्या माहितीसाठी फॉलिकलमुळे एकच केस पांढरा येतो. जोपर्यंत पिगमेंट सेल पूर्णपणे डेड नाही होत तोपर्यंत केस पांढरे होत नाहीत. 


टीप : वरील सर्व बाबी एबीपी माझा केवळ माहिती म्हणून वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत आहे. यातून एबीपी माझा कोणताही दावा करत नाही. 


महत्त्वाच्या बातम्या :


Winter Health Tips : 'या' लोकांनी हिवाळ्यातही गरम पाण्याने आंघोळ करू नये; 'या' आजारांचा वाढता धोका